गोंदियावासीयांना लागली सलमानला पाहण्याची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:29 IST2016-02-09T01:29:48+5:302016-02-09T01:29:48+5:30

शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त गोंदियात आयोजित शानदान समारंभात ...

Gondiya's desire to see Salman keen to see | गोंदियावासीयांना लागली सलमानला पाहण्याची उत्सुकता

गोंदियावासीयांना लागली सलमानला पाहण्याची उत्सुकता

मनोहरभाई पटेल जयंती : आज विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकांनी गौरव
गोंदिया : शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त गोंदियात आयोजित शानदान समारंभात मंगळवारी (दि.९) विविध शाखेच्या १४ गुणवंत विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकांनी गौरविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान असून त्याला पाहण्यासाठी गोंदियावासीयांसोबत लगतच्या जिल्ह्यातील युवा वर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणाऱ्या सलमानला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे वर्गा वर्गात कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, मीडिया गुरू सुहेल सेठ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती तथा मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
गेल्यावर्षी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकरच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याना गौरवित केले होते तर त्याआधी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाला होता. विशेष म्हणजे यापूर्वी २००९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान खा.प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारासाठी खास सलमान मुंबईवरून गोंदियात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सलमानला पाहण्याची संधी गोंदियावासीयांना मिळेल. या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन, माजी आ.हरिहरभाई पटेल यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Gondiya's desire to see Salman keen to see