शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया वनविभागात ८० टक्के रोपटी जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:52 IST

राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत केलेल्या रोपट्यांचे योग्य संवर्धन न केल्याने कोट्यवधी रूपये व्यर्थ जात असल्याची ओरड होत आहे;

वृक्षारोपणाने गिधाडीचे बदलतेय रुप : ओसाड परिसरात पसरत आहे हिरवळलोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत केलेल्या रोपट्यांचे योग्य संवर्धन न केल्याने कोट्यवधी रूपये व्यर्थ जात असल्याची ओरड होत आहे; मात्र गोंदिया जिल्हा याला अपवाद ठरला असून रोपण केलेली ८० टक्के रोपटे जिवंत असल्याने या परिसराचे रुप बदलत असल्याचे चित्रआहे.पर्यावरणाच्या संवर्धन व संतुलनाच्या दृष्टीने सन २०१६ मध्ये १ जुलैला राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यातंर्गत जिल्ह्यात ९ लाख ६३ हजार ६०० रोपट्यांची लागवड केली होती. यापैकी आठ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जिवंत असल्याची हमी जिल्हा प्रशासनाने दिली होती. वन विभागाद्वारे ७४ ठिकाणांवर सात लाख ४८ हजार रोपट्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यापैकी सात लाख २५ हजार ९३८ (९७ टक्के) रोपटे जिवंत असल्याचा दावा प्रशासनाद्वारे करण्यात आला होता. पण, लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ८० टक्के रोपटे शिल्लक होते. परंतु मृत रोपट्यांच्या जागी नवीन रोपटे लावण्यात आले आहेत. यावर्षी चार कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत वन विभागाद्वारे आठ लाख ४६ हजार ८५९ रोपटे लावण्यात आले. गोरेगाव वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्यानुसार, विभागाजवळ सद्यस्थितीत सात लाख रोपटे तयार आहेत. गोरेगाव वन विभागाच्या नर्सरीमध्ये ३५ हजार रोपटे उपलब्ध आहेत. गिधाडी वन परिक्षेत्रात दोन कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत ३३ हजार ९०० रोपटे लावण्यात आले होते. २० टक्के मृत रोपट्यांच्या जागेवर नवीन रोपटे लावण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. वनात सोनी-चिल्हाटी या सात-आठ गावांतील महिला बचत गटांच्या माध्यमातून सागवान, आवळा, बेल, हिरडा, बेहडा, जांभूळ आदींचे रोपटे लावण्यात आले. त्यांचे संगोपणही केले जात आहे.