गंगाबाईत असामाजिक तत्त्वांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:37+5:30

लोकमतने वारंवार बातम्या प्रकाशित करून या रुग्णालयात पोलीस चौकी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पोलिसांची चौकी देण्यात आली. दर आठ तासंसाठी एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी राहणारे पोलिस कर्मचारी रूग्णालय परिसरात गस्त न घालता आपल्या खोलीत झोपा काढत असल्याने असामाजिक तत्वांचे येथे फावते.

Gangabai incorporates anti-social elements | गंगाबाईत असामाजिक तत्त्वांचा शिरकाव

गंगाबाईत असामाजिक तत्त्वांचा शिरकाव

Next
ठळक मुद्देपोलिसांची चौकी नेहमीच राहते बंद । डॉक्टरांनाही मिळतात धमक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय जिल्ह्यात एकमेव शासकीय महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिन्याकाठी ६०० महिलांची प्रसूती केली जाते. या प्रसूतीसाठी गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक येत असल्याने त्यांना धमकावून लुटमार करण्याच्या घटना रात्रीच्यावेळी घडत असतात. मागील काही दिवसांपासून पुन्हा गंगाबाई स्त्री रुग्णालयात असामाजिक तत्वांचा शिरकाव होऊ लागला आहे.
अनेक दिवसापूर्वी गंगाबाई स्त्री रुग्णालयात असेच असामाजिक तत्व वावरत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावून, चमकावून लुटणे व मारहाण करणे या घटना घडल्या होत्या. त्यानंतर लोकमतने वारंवार बातम्या प्रकाशित करून या रुग्णालयात पोलीस चौकी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पोलिसांची चौकी देण्यात आली. दर आठ तासंसाठी एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी राहणारे पोलिस कर्मचारी रूग्णालय परिसरात गस्त न घालता आपल्या खोलीत झोपा काढत असल्याने असामाजिक तत्वांचे येथे फावते. परिणामी लागोपाठ घटना घडत असतात.
अज्ञात इसमाकडून गंगाबाईत कर्मचारी व डॉक्टरांना धमकाविले जाते. तीन ते चार अज्ञात इसम चोरी करण्याच्या उद्देशाने धर्मशाळेत वावरत असतात. यापूर्वी गोंदिया शहर पोलिसांचे पथक रात्रीच्यावेळी गस्त घालायचे. त्यामुळे असामाजिक तत्व वावरत नव्हते. मात्र पोलिसांची पेट्रोलिंग बंद झाल्याने तसेच गंगाबाईच्या परिसराला लागून पानटपरी, चहाटपरी व पडक्या शासकीय इमारतीचा आधार घेवून रात्रीच्यावेळी हे असामाजिक तत्व गंगाबाईतील रुग्णांच्या नातेवाईकांना लुटण्याचा किंवा त्यांना हाणी पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.

असामाजीक तत्वांना पानटपरीचा आधार
गंगाबाई रुग्णालयाला लागून चहाटपरी व पानटपरी बऱ्याच रात्रीपर्यंत सुरू राहत असल्याने असामाजिक तत्व या पानटपरीचा आधार घेतात. सर्व नागरिक झोपी गेल्याचे पाहून ते धर्मशाळेत प्रवेश करतात. गंगाबाईत आलेले कोण कुणाचे नातेवाईक आहेत याची माहिती एकमेकांना नसल्याने झोपण्याचे सोंग धरून हे चोरटे मोबाईल, दागिणे, पैसे व मौल्यवान वस्तु चोरून नेण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्यावेळी एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचे पोट दुखले आणि ते शौचालयासाठी गंगाबाईच्या बाहेर निघाले तर त्यांनाही लुटले जाते.

चौकी नावापुरती
गंगाबाईत असामाजिक तत्वांचा शिरकाव होण्याला पोलीस कारणीभूत आहेत. नागरिकांची ओरड झाल्यावर पोलीस चौकी उघडण्यात आली. मात्र येथे दररोज रात्रीच्या पाळीत पाहिजे तेवढ्या मनुष्यबळाची नियुक्ती केली नाही. एका निशस्त्र पोलीस कर्मचाºयाच्या खांद्यावर एवढ्या मोठ्या गंगाबाई रुग्णालयाची धूरा असते. त्यामुळे तो कर्मचारीही रात्री गस्त न घालता आपल्या चौकीत आराम करतो. गंगाबाईत पोलीस चौकी आहे. परंतु पोलिसांना न जुमानणारे समाजकंटक रात्रीच्यावेळी या ठिकाणी वावरत असतात. येथे असलेली चौकी फक्त नावापुरती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Gangabai incorporates anti-social elements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.