धान उत्पादकांचे आर्थिक शोषण

By Admin | Updated: May 10, 2014 00:35 IST2014-05-10T00:35:48+5:302014-05-10T00:35:48+5:30

तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने शेतकर्‍यांना धानाचे उत्पादन फारच कमी झाले.

Financial exploitation of paddy growers | धान उत्पादकांचे आर्थिक शोषण

धान उत्पादकांचे आर्थिक शोषण

तिरोडा : तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने शेतकर्‍यांना धानाचे उत्पादन फारच कमी झाले. परंतु तलावात पाणी भरपूर वाचल्याने रबीची लागवड जास्त झाली. परंतू आता खरेदी केंद्रच सुरु करण्यात आले नसल्याने व कृ.उ.बा.स. मध्ये आधारभूत किमतीपेक्षा (१३१0) कमी किमतीत धान खरेदी केल्या जात असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी तत्काळ लक्ष घालून शक्य तितक्या लवकर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्‍यांच्यावतीने केली जात आहे.
तालुक्यात चोरखमारा, बोदलकसा, खळबंदा, धापेवाडा उपसा जलसिंचन व मोटारपंपाद्वारे शेतीला सिंचित करण्यात येत आहे. रबी हंगामातील धान निघायला सुरुवात झाली आहे. परंतु धान खरेदी केंद्र सुरु झालेली नाही.

Web Title: Financial exploitation of paddy growers