शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पटोलेंच्या आश्वासनानंतर सोडले उपोषण

By admin | Updated: December 6, 2015 01:47 IST

महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.

नऊ वनमजूर होते उपोषणावर : ३२ रोजंदारी मजुरांवर आर्थिक संकटगोंदिया : महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. खा. नाना पटोले यांच्या पुढाकाराने वनमजुरांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संपत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ९ वनमजूर नवेगाव अभयारण्यातील वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले होते. नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्य व उद्यानात सन २००० पासून ३२ रोजंदारी वनमजूर काम करीत आहेत. १२ वर्ष सेवा दिल्यावर २०१३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आल्यावर या वनमजुरांना काम मिळानासे झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. गेल्या तीन वर्षात वनविभागाने त्यांच्या रोजगाराचा विचार केला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची पाळी आली होती. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सदर वनमजुरांना पूर्ववत काम करण्याची मागणी करीत होते. तसेच अधिकारांशी चर्चा करून वनमजुरांना कोटेशन पद्धतीने कामावर घेण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. वारंवार मागणी करूनही अधिकारी वनमजुरांच्या प्रश्न व समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने व आपल्याला पूर्ववत कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी वनविभाग कार्यालयासमोर ३२ रोजंदारी वनमजुर आमरण उपोषणावर बसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी वनमजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने ९ मजूर वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर उपोषणाला बसले. खा. नाना पटोले यांनी संबधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून वनमजुरांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करून वनमजुरांच्या सर्व मागण्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. सोबतच वनकर्मचारी व वनमजुरांच्या संघटनेची बैठक हिवाळी अधिवेशनात घडवून आणून इतर समस्यांही सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खा. पटोलेंच्या आश्वासनानंतर संघटनेचे अध्यक्ष व वनमजुरांनी आपले उपोषण मागे घेतले. खा. पटोले यांनी उपोषणावर असलेल्या वनमजुरांना निंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी प्रामुख्याने वनविभागाचे विभागीय वनाधिकारी कातोरे, उपविभागीय वनअधिकारी गुप्ता, वनपरिक्षेत्राधिकारी दोनोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)