शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा जाळून केला खून

By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST

सालेकसा तालुक्यातील रुंगाटोला येथील अंकालू चैतराम परतेती (४७) ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा चेहरा जाळून खून करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह रूंगाटोला नजीक रविवारी गावकऱ्यांना दिसला.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील रुंगाटोला येथील अंकालू चैतराम परतेती (४७) ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा चेहरा जाळून खून करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह रूंगाटोला नजीक रविवारी गावकऱ्यांना दिसला.प्राप्त माहितीनुसार, परतेती हे रुंगाटोला येथे पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी टाकीवर मासीक रोजीवर काम करीत होते. घटनेच्या दिवशी ते पाणी टाकीवर कामासाठी गेले होते. दररोज संध्याकाळी कामावर जाऊन रात्रीच्या वेळी तिथेच थांबायचे व सकाळी घरी परत यायचे. ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला काही बिहारी व्यक्ती मासे पकडण्याकरिता राहतात. ३१ डिसेंबरला सायंकाळी घरुन गेल्यावर रात्रीच्या वेळी अंकालू परतेती यांनी त्या बिहारी लोकांसोबत जेवण केले. मात्र त्यानंतर रात्रीच ते बेपत्ता झाले. इकडे सकाळी अंकालू घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. मात्र त्यांचा पता लागला नाही. त्यामुळे अंकालूच्या भावाने सालेकसा पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केली असता बिहारी व्यक्तींनी अंकालू हा त्याच रात्री घरी मासे सोडून देतो म्हणून घरी गेला होता असे सांगितले. मात्र याबाबतीत काहीतरी गडबड असल्याची चर्चा गावात होती. अंकालूचा मृतदहे रूंगाटोला नजीक आढळला. त्यांचा चेहरा जाळला होता. त्यांना मारल्यांनतर त्यांची ओळख पटू नये यासाठी त्यांचा चेहरा जाळला असावा. या ठिकाणी राहणारा एक बिहारी तेथून पसार झाल्यामुळे सालेकसा पोलिसांनी त्याला बिहारमध्ये पकडल्याची माहिती आहे.(वार्ताहर)