शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ची २.२५ हेक्टर जमीन अतिक्रमणात

By admin | Updated: January 10, 2015 22:56 IST

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २.५ हेक्टर आर जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. काही पुढाऱ्यांनी तर या जमिनीवर अवैधपणे व्यापार संकुलच बनवून घेतले.

आमगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २.५ हेक्टर आर जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. काही पुढाऱ्यांनी तर या जमिनीवर अवैधपणे व्यापार संकुलच बनवून घेतले. परंतु या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून रस्त्यालगत दुकान थाटून उपजिविका चालवणाऱ्यांवर बुलडोजर चालविण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्यामुळे ही अतिक्रमण हटाव कारवाई ‘दिव्याखाली अंधार’ असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.आमगाव तालुक्यात आमगाव ग्रामपंचायत व बनगाव ग्रामपंचायतच्या सिमेवर जिल्हा परिषदेच्या मालकीची २.२५ हेक्टर आर.जमीन आहे. या जमिनीवर आठवडी बाजाराचा लिलाव जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येतो. ही जागा काही राजकीय पुढाऱ्यांनी हस्तगत करुन अनधिकृतपणे त्यावर व्यापार संकुल बांधकाम करण्यात आले. या बांधकामाची रितसर तक्रार ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेकडे केली. तसेच अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी या अवैध बांधकामावर पांघरून घालण्याचे प्रयत्न केल्याने सलग दोन वर्षे पूर्ण होऊनही जिल्हा परिषदेच्या जमिनीवर अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या जमिनींवर अतिक्रमणाला अधिक वाव मिळाला. अनेक व्यक्तींनी या जमिनीवर पक्के बांधकाम करुन इमारती उभारल्या आहेत. व्यापार संकुल बांधकाम करताना पुढाऱ्यांनी आपले हित जोपासण्यासाठी अवैध बांधकामाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे बांधकाम झालेल्या व्यापारी गाळ्यात इतरांनी अवैधपणे आपली मालकी दाखवून गाळे हस्तगत केले आहेत. परंतु जिल्हा परिषदेने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. कोट्यवधीची जमीन खासगी अतिक्रमणात जाताना जिल्हा परिषद गप्प का? हा संशोधनाचा विषय आहे. (शहर प्रतिनिधी)