शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाविरूद्ध आदिवासींचे धरणे

By admin | Updated: January 10, 2015 01:36 IST

आदिवासी संस्कृतीशी धनगर समाजाचा संबंध नाही, त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देऊ नये. आदिवासी समाजाच्या आरक्षणात गैरआदिवासींची ही घुसखोरी सहन केली जाणार नाही, ...

गोंदिया : आदिवासी संस्कृतीशी धनगर समाजाचा संबंध नाही, त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देऊ नये. आदिवासी समाजाच्या आरक्षणात गैरआदिवासींची ही घुसखोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व डॉ.नामदेव किरसान, जि.प.महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, माजी आमदार दिलीप बन्सोड आदींनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बोलताना अ‍ॅड.किरसान म्हणाले, आदिवासींनी आतापर्यंत जल, जमीन, जंगल ही अखिल मानवजातीला जीवित राहण्याकरिता आवश्यक असणारी संपत्ती जपून ठेवली आहे. आदिवासी समाजावर अलिकडच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच भौगोलिक आक्रमणे सुरू झाली आहेत. त्यातूनच बोगस आदिवासींनी आदिवासींच्या सवलती लाटून मूळ आदिवासींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. आता धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात स्थान दिल्यास आदिवासी समाजातील लोकांसह सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. या धरणे आंदोलनात पी.बी.टेकाम, माजी सभापती श्रावण राणा, गोपाळ उईके, परमेश्वर उईके, जगन धुर्वे, शिलाताई उईके, सुरेश कुंभरे, विजय इस्पाते, कृष्ण पंधरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)भाजप सभापतीचा स्वपक्षाविरूद्ध एल्गारया आंदोलनात आ.संजय पुराम यांच्या प्रतिनिधी म्हणून सभापती सविता पुराम उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात आपल्यासाठी आधी समाज, नंतर पक्ष व नंतर पद महत्वाचे असल्याचे सांगितले. आदिवासींच्या आरक्षणावर गदा आल्यास पहिला राजीनामा संजय पुराम यांचा राहील, असे सांगून त्यांनी आपल्याच पक्षाविरूद्ध दंड थोपटले. आरक्षण होते म्हणूनच मला किंवा आ.संजय पुराम यांना पद मिळाले. आम्ही सत्तापक्षाचे जरी असलो तरी आमच्यासाठी समाज आधी महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या.