दीड लाख लोकांची तहान भागविणारी डांर्गोली योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:17+5:30

तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळमेळ थोडाफार जुळला नसल्याने पाणी टंचाईची थोडीफार झळ सोसावी लागली होती.

The Dangoli scheme, for thirsty 1.5 lakh people | दीड लाख लोकांची तहान भागविणारी डांर्गोली योजना

दीड लाख लोकांची तहान भागविणारी डांर्गोली योजना

Next
ठळक मुद्दे८९.७५ लक्ष लिटर पाणी पुरवठा। पाच टाकींमधून होतो शहराला पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून शहराला पाणी पुरवठा करणारी डांर्गोली पाणी पुरवठा योजना शहरासाठी जीवनदायीनी ठरत आहे.शहराला दररोज ८९.७५ लक्ष लिटर पाणी पुरवठा या योजनेतून केला जात असून शहरातील पाच पाणी टाकींमधून पाण्याचे वितरण होत आहे. शहरासाठीच्या या पाईप लाईनवर सुमारे आठ गावे असून त्यांचीही स्वतंत्र योजना असल्याने पाण्याचा प्रश्न कधी या गावांमध्ये निर्माण झाला नाही.
तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळमेळ थोडाफार जुळला नसल्याने पाणी टंचाईची थोडीफार झळ सोसावी लागली होती. पण जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे डोंर्गोली येथील योजनेतून शहराची ही समस्या यशस्वीरित्या सोडविण्यात आली होती. सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून शहराला पाणी पुरवठा केला जातो.यासाठी लगतच्या ग्राम कुडवा येथे जलशुद्धीकरण केंद्र असून तेथून शहरातील वेगवेगळया भागात असलेल्या पाच टाक्यांत पाणी दिले जाते. अशाप्रकारे दररोज ८९.७५ लक्ष लिटर पाणी या टाक्यांत जात असून त्यांच्याद्वारे शहरात पुरवठा केला जातो. म्हणूनच डांर्गोली योजनेला गोंदिया शहराची जीवनदायीनी म्हटले जाते.

गावांचीही स्वतंत्र व्यवस्था
डांर्गोलीपासून गोंदियाला येत असलेल्या पाईपलाईन लगत ग्राम डांगोरली, दासगाव, निलज, गिरोला, लहीटोला, पांढराबोडी, जब्बारटोला व कुडवा ही गावे आहेत.यातील बहुतांश गावांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. शिवाय, गावातील विहिरी व बोअरवेलमुळे त्या गावांत पाणी पुरवठा होत असून कधी पाणी पेटल्याची स्थिती निर्माण होत नाही. परिणामी, पाण्याची चोरी किंवा पाण्यासाठी आंदोलनाची पाळी उद्भवलेली नाही. त्यातल्या त्यात एखाद्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यास किंवा देखभाल दुरूस्तीला घेऊन झालेली पाणी गळती सोडून अन्यथा पाणी गळतीची समस्याही जाणवत नाही.

१५ हजार हेक्टरवर सिंचन
डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत डांर्गोली उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून परिसरातील १५ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात येथील पाण्याची मदत होते.

जब्बारटोला गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. पाऊस कमी प्रमाणात झाल्यास थोडी समस्या जाणविते. मात्र भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.
- दिलीपसिंह गहरवार, गावकरी

दासगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे.शिवाय पाण्याचे स्त्रोत देखील अधिक असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची फारशी समस्या जाणवित नाही. या भागात अद्याप पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसून स्थानिक ग्रामपंचायत यासाठी उपाय योजना राबवित असते.
- पंचम गिरी, गावकरी

गोंदिया तालुक्याला लागूनच वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे या भागातील पाणी पातळी नेहमी चांगले असते. शिवाय सिंचनासाठी सुध्दा या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतकरी करतात. या भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत नाही.
- मुकेश जगणे

Web Title: The Dangoli scheme, for thirsty 1.5 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.