पेंढाऱ्यांची मुले शिकू अन् टिकूही लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:25+5:30

भीक मागण्यासाठी भटकंती करणारे, आत्मविश्वास गमावून बसलेले, काळानुरूप बदलण्याची मानसिकता नसलेले व परंपरागत व्यवसायाला चिटकून बसलेल्या पेंढारी समाजातील १२ मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामे गोंदिया तालुक्यातील नवेगाव धापेवाडा येथील शिक्षकांनी केली आहेत. आता ती पेंढाऱ्यांची मुले दररोज शाळेत येऊ लागली आहेत.

The children of the crows began to learn and survive | पेंढाऱ्यांची मुले शिकू अन् टिकूही लागली

पेंढाऱ्यांची मुले शिकू अन् टिकूही लागली

Next
ठळक मुद्दे१२ विद्यार्थी करताहेत ज्ञानार्जन: नवेगाव धापेवाडा शाळेतील शिक्षकांचे यशस्वी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पेंढारी जमात ही सुरूवातीपासूनच शिक्षणापासून कोसो दूर आहे. भीक मागण्यासाठी भटकंती करणारे, आत्मविश्वास गमावून बसलेले, काळानुरूप बदलण्याची मानसिकता नसलेले व परंपरागत व्यवसायाला चिटकून बसलेल्या पेंढारी समाजातील १२ मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामे गोंदिया तालुक्यातील नवेगाव धापेवाडा येथील शिक्षकांनी केली आहेत. आता ती पेंढाऱ्यांची मुले दररोज शाळेत येऊ लागली आहेत.
पेंढारी जमातीला प्रगतीचे पंख कधी फुटणार?सद्यस्थितीत त्यांचे भविष्य अंधकारमय राहू नये यासाठी नवेगाव धापेवाडा शाळेतील शिक्षकांचा खटाटोप आहे. या विद्यार्थ्यांचा उत्थान करण्याचा विडा उचलला केंद्रप्रमुख आर.डी.पटले, मुख्याध्यापक सी.पी.चन्ने,बालरक्षक सी.एच.बिसेन यांच्या नेतृत्त्वात आर.सी.चौधरी, गजभिये, ए.टी.सेंदूरकर, एल.आर.राऊत, आर.एच.राऊत, एम.उके यांनी त्यांना दररोज शाळेत येण्याची सवय लागावी यासाठी तशा वातावरणाची निर्मिती केली. ते शाळेत यावे व टिकूनही राहावेत यासाठी शिक्षकांनी सतत गृहभेटी करून त्यांच्या पालकांचे मनपरिवर्तन केले. मागील सत्रात दांडी मारणाऱ्या पेंढाऱ्यांच्या मुलांना आता मुख्यप्रवाहात आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. त्या विद्यार्थ्यांना आता मराठी वाचता येत नसली तरी बेरीज वजाबाकीत करण्यात ते तरबेज झाले आहेत.

मुख्य प्रवाहात आलेली हीच ती पेंढाऱ्यांची मुले
नवेगाव धापेवाडा शाळेत नियमीत येत असलेल्या पेंढाºयांच्या मुलांमध्ये वर्ग पहिली मधील आशिष राजेश पात्रे, आशिष निलकंठ पात्रे, अनुगिरे मनोज पात्रे, पुजा निलकमल पात्रे, दुसऱ्या वर्गात ज्योत मनोज पात्रे, स्तुती लखन बिसेन, सृष्टी कैलाश बिसेन, तिसऱ्या वर्गात आशू मनोज पात्रे, आराधना बंडू पात्रे, चौथ्या वर्गात करूणा राजेश पात्रे, पाचवीत शिवम लखन बिसेन व सातवीत शायद राजेश पात्रे ही मुले शिक्षणासाठी दररोज शाळेत येऊ लागली आहेत.

Web Title: The children of the crows began to learn and survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.