शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलाने पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST

तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली

काचेवानी : तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली असून रोग व किडींच्या प्रादुर्भावाने ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तिरोडा तालुक्यात एकूण ३२ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र धान्य लागवडीखाली आहे. तूर, भाजीपाला व केळी वगळता ३० हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. सन २०१४-१५ च्या रबी हंगामात तृणधान्य गहू ४०७.८० हेक्टर क्षेत्रात, कडधान्य हरभरा ९५७.८० हेक्टरमध्ये, लाखोळी तीन हजार ६१० हेक्टरमध्ये, पोपट १९१ हेक्टरमध्ये, जवस एक हजार ८२१ हेक्टरमध्ये, मोहरी व इतर ७.८० हेक्टरमध्ये तर भाजीपाला २४०.४० हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. तालुक्यात रबी हंगामात ७२३५.८० हेक्टर क्षेत्रात विविध पिके घेतले जात आहेत. मात्र सतत १५ ते २० दिवसांच्या अंतराने होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे.सध्यस्थितीत तिरोडा तालुक्यात तुरीच्या शेंगा लागल्या असून त्या दाना भरण्याच्या मार्गावर असतानाच ढगाळ वातावरणाने त्यांच्यावर किडीचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.सध्या रबी हंगामातील कडधान्य व तृणधान्य रोपट्या अवस्थेत आहे. त्यामुळे कीड किंवा रोगाची समस्या उद्भवली तरी त्यावर नियंत्रण मिळविले जावू शकते. परंतु अशीच समस्या राहील तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. हरभऱ्यावरील घाटेअळी, गव्हावरील तांबेरा रोग अतिशय विनाशकारी असल्याने शेतकऱ्यांनी पिकाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी कळविले आहे. (वार्ताहर)