शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसात झाडीबोलीची गुंज

By admin | Updated: January 10, 2015 22:56 IST

झाडीबोली साहित्याला जिवंत ठेवण्यासोबतच या परिसरात रूजविण्याचा संकल्प करीत सालेकसा येथे २२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाला शनिवारी सुरूवात झाली.

२२ वे साहित्य संमेलन : ग्रंथदिंडी, कलाविष्कारांनी वेधले सर्वांचे लक्षसालेकसा (स्व.हरिदास बडोले साहित्यनगरी : झाडीबोली साहित्याला जिवंत ठेवण्यासोबतच या परिसरात रूजविण्याचा संकल्प करीत सालेकसा येथे २२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाला शनिवारी सुरूवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक धनराज ओक आहेत.स्व.हरिदास बडोले साहित्य नगरी असे नामकरण केलेल्या खिलेश महाविद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे उद्घाटन आ.संजय पुराम यांच्या हस्ते दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राकेश शर्मा, लखनसिंह कटरे, प्रतिभाताई परिहार, खेमराज साखरे, लोकराम शेंडे, राम महाजन, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, विष्णू भेंडारकर, डोमा कापगते, हिरामण लंजे आदी साहित्यिक मंडळी प्रामुख्याने मंचावर विराजमान होती. झाडीबोली साहित्य मंडळ, सालेकसा यांच्या पुढाकाराने हे संमेलन दोन दिवस चालणार आहे.उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक खेमराज साखरे यांनी, संचालन चंद्रकुमार बहेकार यांनी तर आभार प्रदर्शन खुशाल साखरे यांनी केले. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी प्रा.खुशाल साखरे, प्रा.महेंद्रकुमार वैद्य, प्रा.अश्विन खांडेकर, पवन पाथोडे, प्रा.राकेश रोकडे, लोकेश नागरिकर, महेश क्षीरसागर, प्रा.उमेश वलथरे, दिलीप सिंद्राम, आचल शहारे, डेविड मेश्राम, रंजूताई उके, उमाशंकर तरोणे, तुकाराम शेंडे, आरती बघेले, सरिता बिसेन, गीता राणे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)पुस्तकांचे प्रकाशनझाडीबोली साहित्य संमेलनात झाडीबोलीतील लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यात प्राणज्योत (पवन पाथोडे), माझी जीवन नौका (डोमा कापगते), श्रद्धा सुमन भजनावली (डोमा कापगते), सोन्याचा पिंजरा (हिरामण लंजे), चिंतन बुढापे का (धनराज ओक), मोतीराम बाबा अभंगावली (सुभाष धकाते), सावित्रीच्या लेकी (शशिकला गावतुरे), साजोनी (सुखदेव चौथाले) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.साहित्यिकांचा मानसन्मानकाही साहित्यिकांचा सत्कारही याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात गजानंद बाडगे कविता पुरस्कार बंडोपंत बोडेकर (खंजरी) यांना देण्यात आला. घनश्याम डोंगरे शोध पुरस्कार चंद्रपूरचे डॉ.शाम मोहरकर (झाडीपट्टी रंगभूमी) यांना व द.सा. बोरकर आत्मकथा पुरस्कार अंजनाबाई खुणे यांच्या झाडीचा झेलना या पुस्तकांना देण्यात आला.