शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे अद्याप २२ कनेक्शन कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते. हाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे.

ठळक मुद्देसहा कनेक्शन जोडले : ३८.६८ लाखांची थकबाकी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज बिलाची थकबाकी न भरल्याचा फटका म्हणून वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचे कनेक्शन कापले आहेत. मंगळवारी (दि.१०) अर्जुनी-मोरगाव येथील चार व तिरोडा येथील दोन कनेक्शनचे पैसे भरण्यात आल्याने सहा कनेक्शन जोडण्यात आले होते. मात्र २२ कनेक्शनची बत्ती गुली होतीच व त्यांची ३८.६८ लाखांची थकबाकी कायम असल्याची माहिती आहे.मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते. हाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे. यंदा महावितरणने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने यंदा २८ एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली होती.परिणामी बीएसएनएल ग्राहकांची चांगलीच फसगत होत आहे. मंगळवारी (दि.१०) बीएसएनएलच्या कापण्यात आलेल्या कनेक्शनची स्थिती जाणून घेतली असता २८ पैकी तिरोडा तालुक्यातील दोन कनेक्शनचे तर अर्जुनी-मोरगाव येथील पाच कनेक्शनचे पैसे भरण्यात आल्याने हे सहा कनेक्शन सुरू करण्यात आल्याचे कळले. मात्र त्यानंतरही २२ कनेक्शनची बत्ती मंगळवारीही गुल होती. यात, गोंदिया शहरातील तीन कनेक्शन बंद असून त्यांची सुमारे चार लाख रूपयांची थकबाकी आहे. तिरोडा तालुक्यातील तीन कनेक्शन बंद असून तेथील सुमारे १८ लाख रूपयांची, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० कनेक्शन बंद असून त्यांची १३.६८ लाख रूपयांची थकबाकी आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा कनेक्शन बंद असून त्यांची तीन लाख रूपयांची अशी एकूण ३८ लाख ६८ हजार रूपयांची थकबाकी कायम आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल