शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्याच्या शिंगाडा तलावात सौंदर्यीकरण

By admin | Updated: January 12, 2015 22:52 IST

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराच्या सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आता लवकरच पाऊल पुढे उचलले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराच्या सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आता लवकरच पाऊल पुढे उचलले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असून राज्य शासनाने सदर कामाच्या खर्चासाठी ५० लाख रूपये मंजूर केले आहेत.काही वर्षांपूर्वी तिरोड्याच्या सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठविण्यात आले होते. या प्रस्तावाला शासकीय निर्णयांतर्गत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी देत ५० लाख रूपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. तिरोडा शहराचे महत्त्व आता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळच अदानी पॉवर प्लाँट सुरू झाल्याने तिरोड्याच्या विकासाची दिशा स्पष्ट दिसून येत आहे. परंतु शहरात तसेच जवळील परिसरात मनोरंजनाचे कोणतेही विशेष साधन उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त होते.ही बाब हेरून नगर परिषदेने सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाची योजना तयार केली. या योजनेंतर्गत तेथील बालकांसाठी सुंदर उद्यानाची उभारणी होईल. एवढेच नव्हे तर तलावात नौकाविहार सुरू केले जाईल. याचा उपयोग विशेष करून बालकांना होईल. संपूर्ण कुटुंबासह बालके याचा लाभ घेवू शकतील.राज्य शासनाने सन २००६-०७ पासून राज्य सरोवर संवर्धन योजना सुरू केली. आता याच योजनेतून सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.या योजनेच्या माध्यमातून तलावाच्या पाण्यातून प्रदूषणाचे स्त्रोत शोधून त्याची वाढ थांबविणे, तलावात जमा झालेली माती काढणे, तलावाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी निरूपयोगी वनस्पती नष्ट करणे, जैविक प्रक्रियेतून पाण्याच्या गुणवत्तेत सुधार करणे, तलावाच्या तटाचे सौंदर्यीकरण, हिरवळ पट्टा विकसित करणे, कंपाऊंड करणे, बालोद्यान सुरू करणे, नौका विहार व स्वच्छता गृह निर्माण करण्याकरिता सदर रक्कम मंजूर करण्यात येते. परंतु ही रक्कम मिळवून घेण्यासाठी व काम पुढे वाढविण्यासाठी राज्य शासनाने नगर परिषदेवर काही अटी व नियम लादले आहेत. या अटींची पूर्तता केल्यावरच काम पुढे वाढू शकेल.आता या तलावाबाबत तिरोडावासीयांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे दिसते. (प्रतिनिधी)