शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार प्राप्त गावांतच हागणदारी मुक्तीचा धुव्वा

By admin | Updated: January 11, 2015 22:55 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्याने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. मात्र आजघडीला त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात उघड्यावरील

सालेकसा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्याने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. मात्र आजघडीला त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी रोजचेच चित्र झाले असून यंत्रणा कोठेतरी कमी पडत आहे. मात्र घाण व दुर्गंधी आजाराला आमंत्रण देत असून यावर प्रभावी योजनेची गरज आहे.ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी. लोकांनी शौचालय बांधून त्यांचा वापर करावा व रोगांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २००० पासून राबविले. याशिवाय अन्य प्रोत्साहन योजना राबविल्या जात आहेत. यांतर्गत शौचालय बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. मात्र असे असले तरीही ४० टक्के लोक उघड्यावर शौचास बसत आहेत. तर बांधण्यात आलेले शौचालय गोवऱ्या, काड्या व टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी उपयोगात आणले जात असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या सांगून शौचालयांचा वापर केला जात नाही अशी परिस्थिती दिसून आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील पुरस्कार प्राप्त गावांतही योजनेचा धुव्वा उडाला आहे. सालेकसा ते आमगाव या मुख्य मार्गावरील गावांत सकाळ-सायंकाळ रस्त्याच्याकडेला हा प्रकार दिसून येतो. जेव्हा मुख्य मार्गावरील ही अवस्था आहे तर आतील गावांबाबत न बोलणेच बरे. सन २००८ मध्ये जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींनी निर्मल ग्राम योजनेचा पुरस्कार पटकाविला. नव्या-नव्यात सन २००९ ते २०१२ या काळात मोठ्या प्रमाणात शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्या शौचालयांचा वापर निम्मे लोकही करताना दिसून येत नाही. अनेक गावांमध्ये उघड्यावर हागणदारीचे चित्र अद्याप कायम आहे. तर स्वच्छता मोहीम मात्र काही कालांतराने संपुष्टात आल्याचे निर्दशनास येते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुर्लक्षामुळे गावांत घाण व दुर्गंधी फोफावत चालली असून यातून आजारांना आमंत्रण मिळत आहे. अशात यावर तोडगा म्हणून ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याकरिता नवीन संशोधन व उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)