शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची उपासमार

By admin | Updated: January 10, 2015 22:57 IST

ताराचंद खडसे मागासवर्गीय श्क्षिण प्रसारक संस्था नागपूरद्वारा संचालित अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा सालेकसा या आश्रमशाळेची मान्यता आॅगस्ट २०१४ पासून कायमस्वरुपी रद्द केली आहे.

सालेकसा : ताराचंद खडसे मागासवर्गीय श्क्षिण प्रसारक संस्था नागपूरद्वारा संचालित अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा सालेकसा या आश्रमशाळेची मान्यता आॅगस्ट २०१४ पासून कायमस्वरुपी रद्द केली आहे. या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन तात्पुरत्या स्वरुपात इतर रिक्त ठिकाणी करण्याचे आदेश आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले. मात्र १९ कर्मचाऱ्यांपैकी १३ कर्मचाऱ्यांचे समायोजन अजूनपर्यंत झालेले नाही. संबंधित शाळा त्यांना जागा रिक्त नाही म्हणून रुजू करुन घेण्यास तयार नाहीत. नियमानुसार, कर्मचाऱ्यांचे समायोजित करण्यात येईपर्यंतच्या कालावधीचे प्रलंबित अनुज्ञेय वेतना अदा करण्याची कार्यवाही संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी करावी. ज्या संस्था कर्मचाऱ्यांच्या समायोजनास नकार देतील अशा संस्थांच्या आश्रमशाळेवर नियमानुसार कार्यवाही करावी तसेच काटेकोर तपासणी करुन अहवाल आयुक्तांकडे पाठवावा. समायोजन झाल्याशिवाय नवीन भरती करण्यास आश्रमशाळांना परवानगी देऊ नये, असेही निर्देश प्रधान सचिवांनी दिलेले आहेत. काही कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले व काही समायोजनास गेले असता त्यांना शाळांनी घेतले नाही. ए.एम. राणे या कर्मचाऱ्याला देवलरी ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील शाळेने जागा रिक्त नाही म्हणून घेण्यास नकार दिला. या बद्दलची माहिती नागपूर येथील अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांना देण्यात आली. त्यांनी प्रतिक्षा करायला सांगितले. मानसिक धक्याने त्यांचा मृत्यू झाला. १५ आॅगस्ट २०१४ पासून शाळा बंद झाल्यावर अजूनपर्यंत ४ महिने झाले तरी या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात आलेले नाही.एच.ए. चौधरी, डी.व्ही. उपवंशी, आर.बी. नागपुरे, सी.टी. टेंभरे, व्ही.जी. अंबुले, एस.के. बागडे, डी.डी. बेहकारे, ए.ए. कनोजे, मडावी, आर.एच. बिसेन, ए.एम. राणे, आर.एस. तायवाडे, एम.के. सूर्यवंशी व इतर कर्मचाऱ्यांचे आॅगस्ट महिन्यापासूनचे वेतन थकित असून त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पण प्रकल्प अधिकारी देवरी यांनी काहीही कार्यवाही केलेली नाही. अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढावे असे निर्देश दिल्यावरही प्रकल्प अधिकारी देवरी यांनी अजूनपर्यंत त्या कर्मचाऱ्यांचे पगार काढलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)