शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १५३ पाणी पुरवठा योजना

By admin | Updated: December 7, 2015 05:48 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा

कपिल केकत ल्ल गोंदियाजिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने पाणी पुरवठा योजना तयार केल्या जात आहेत. यात आता अधिकची भर घालत जिल्ह्यासाठी आणखी १५३ योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत. प्रस्तावित केलेल्या या योजनांची यादी विभागाकडून स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आली आहे. पाणी जीवनाश्यक वस्तू असतानाच सर्वांना पाणी ही शासनाची मूलभूत जबाबदारी व सर्वांचा अधिकार आहे. मात्र उन्हाळ्यात जिल्ह्यातील कित्येक गावांत पाणी पेटते. पाण्याअभावी गावकऱ्यांना इतरत्र भटकावे लागत असल्याचेही प्रकार जिल्ह्यात घडतात. याचे कारण आजही कित्येक गावांत नळ योजना नाही, तर काही गावांत वाढलेल्या लोकसंख्येमुळे असलेली योजना पुरेपूर पाणी पुरवठा करू शकत नाही. या सर्व प्रकारांवर जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग नजर ठेवून आहे. यातूनच पाणी टंचाई या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सन २०१४-१५ मध्ये मार्चपर्यंत १०४ योजना तयार केल्या. मात्र यानंतरही कित्येक गावांत नळ योजना नसल्याने किंवा वाढीव योजना देण्याची गरज आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून यंदा १५३ योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये सर्वाधिक योजना अर्जुनी-मोरगाव तालुक्याला देण्यात आल्या असून या योजनांची यादी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आली आहे. या योजनांना मंजूरी मिळाल्यास जिल्ह्यातील बहुतांश गावांना त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना लाभणार आहे. परिणामी उन्हाळ्यात जिल्ह्यात पेटणारी पाणी टंचाईची समस्या आटोक्यात येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याचा लाभ असा होणार की, पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागणार नाही व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रयत्न खऱ्या अर्थाने फळाला येणार. अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सर्वाधिक योजना ४ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या १५३ योजनांमध्ये सर्वाधिक योजना अर्जुनी-मोरगाव तालुक्याला देण्यात आल्या आहेत. २८ योजना यंदा अर्जुनी-मोरगावला देण्यात आल्या असून सर्वात कमी आठ योजना आमगावसाठी आहेत. यावरून अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांची गरज जास्त असल्याचे म्हणता येईल. प्रस्तावित केलेल्या योजनांचा तक्ता तालुकासंख्याआमगाव८अर्जुनी-मोरगाव२८देवरी १३गोंदिया२६गोरेगाव१६सडक-अर्जुनी २४सालेकसा११तिरोडा२७एकूण१५३