शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

९८ योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा

By admin | Updated: December 6, 2015 01:52 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ९८ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम : १०४ योजनांचे काम पूर्ण कपिल केकत  गोंदिया राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ९८ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा आहे. विद्युत कनेक्शन न मिळाल्यामुळे या योजना तयार असूनही ग्रामीण नागरिकांची तहान भागविण्यात अपयशी ठरत आहेत. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले होते. फेब्रवारी २०१५ पर्यंत या १०४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजनांचे काम पूर्ण झाल्याने विभागाने वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. तर वीज वीतरण कंपनीकडून आलेल्या डिमांंडनुसार आतापर्यंत ५२ योजनांची डिमांड भरून झाली असून सहा योजनांची वीज जोडणी झाली आहे. मात्र उर्वरीत ९८ योजना वीज कनेक्शन नसल्यामुळे उभ्या असून पांढरा हत्ती ठरत आहे. योजना आहेत मात्र त्यांना चालविण्यासाठी वीज कनेक्शन नसल्यामुळे या योजना ग्रामीणांची तहान भागविण्यात अपयशी ठरत आहेत. ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सुटावी व कुणी तहानलेले राहू नये या उदात्त हेतूतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या योजना तयार केल्या. मात्र वीज कनेक्शन अभावी या योजनांचे फलीत लाभत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वीज कनेक्शनसाठी विभागाचा वीज कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून मध्यंतरी या विषयाला घेऊन बैठक झाली आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून काही तांत्रीक कारणांमुळे कनेक्शनचे काम रेंगाळत चालल्याचे कळले. आता यावर काय तोडगा निघतो व कधी योजनांना वीज कनेक्शन मिळते याकडे मात्र ग्रामीणांचे लक्ष लागले आहे.