पाच दारूविक्रेत्यांकडून ८६ हजाराचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:29+5:30

गोंदिया तालुक्याच्या आसोली येथील शेतात प्रदीप उर्फ मोटू गणवीर (२६) व शिवन चंद्रभान गणवीर (५०) दोन्ही रा. आसोली हे मोहफुलापासून दारू गाळत असताना पोलिसांनी धाड घातली. यात शिवम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर प्रदीप उर्फ मोटू गणवीरला अटक करण्यात आली. त्या ठिकाणातून ८८० किलो मोहफुल किंमत ४८ हजार, ४० लिटर हातभट्टीची दारू किंमत ४ हजार व इतर साहीत्य असा एकूण ७३ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला.

86 thousand goods seized from five liquor dealers | पाच दारूविक्रेत्यांकडून ८६ हजाराचा माल जप्त

पाच दारूविक्रेत्यांकडून ८६ हजाराचा माल जप्त

Next
ठळक मुद्देमोहफुलाच्या दारूचा महापूर । उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवैध दारु विक्रेत्यांविरोधात शासनाचे कडक पाऊल असतांनाही अनेक लोक मोहफुलाची दारू गाळून विक्री करीत आहेत. अश्या पाच जणांवर कारवाई करीत ८५ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.
गोंदिया तालुक्याच्या आसोली येथील शेतात प्रदीप उर्फ मोटू गणवीर (२६) व शिवन चंद्रभान गणवीर (५०) दोन्ही रा. आसोली हे मोहफुलापासून दारू गाळत असताना पोलिसांनी धाड घातली. यात शिवम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर प्रदीप उर्फ मोटू गणवीरला अटक करण्यात आली. त्या ठिकाणातून ८८० किलो मोहफुल किंमत ४८ हजार, ४० लिटर हातभट्टीची दारू किंमत ४ हजार व इतर साहीत्य असा एकूण ७३ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. आसोली येथील रणवीर रोशन डोंगरे (२६) रा.आसोली याच्या घराची झडती घेतली असता ९० किलो मोहफुल किमत ५ हजार ४०० रूपये व इतर साहित्य असा एकूण ८ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुन्हा तिसºया ठिकाणी सरीता रविंद्र नागदेवे (५४) रा.आसोली व मिनेश रविंद्र नागदेवे (२५) याच्या घरून ३० किलो मोहफुल व प्लास्टिक ड्रम असा ३ हजार ३०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार, सहाय्यक फौजदार रामलाल सार्वे,पोलीस नायक खेमराज बोधनकर, पोलीस नायक अशोक अंबरवाडे, दुर्गाप्रासद कनोजे, पृथ्वीराज चव्हाण, सपना कोटांगले, अशोक कांबळे यांनी केली.

Web Title: 86 thousand goods seized from five liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.