शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

१७ तलावांवर उद्या पुन्हा पक्षीगणना

By admin | Updated: January 10, 2015 01:31 IST

जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नाही.

गोंदिया : जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नाही. २१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील १७ तलावांवर वनविभागाकडून पक्षीगणना करण्यात आली. आता रविवारी ११ डिसेंबरला पुन्हा पक्षीगणना होणार आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची पुर्तता अजूनही करण्यात आलेली नाही. अपुऱ्या दुर्बिणींनीच होत असलेली ही पक्षीगणना कितपत सार्थकी लागेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशाने वनविभागाला आता दरवर्षी अधिकृत पक्षीगणना करावी लागणार आहे. जिल्ह्यातील नवेगावबांधसह अन्य काही तलावांवर देशी व विदेशी अशा ७५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर राहतो. जिल्ह्यात येणाऱ्या या पक्ष्यांची नोंद यापूर्वी काही पशु व पक्षीप्रेमी संघटनांकडून ठेवली जात होती. मात्र त्यात वन विभागाचे काहीच घेणे-देणे नसायचे. मात्र विदेशी पक्ष्यांचे जिल्ह्यातील आगमन, त्यात होत असलेली वाढ किंवा घट ही बाब आता वन विभागाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच राज्य वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी अवघ्या राज्यात पक्षी गणना करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या या आदेशानुसार आता वन विभागाला दरवर्षी पक्षी गणना करणे बंधनकारक झाले आहे. ही पक्षीगणना दोन टप्प्यात करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार २१ डिसेंबरला पहिला टप्पा पूर्ण झाला. आता येत्या ११ जानेवारी रोजी दुसऱ्या टप्यात ही पक्षी गणना केली जाणार आहे. यासाठी काही सामाजिक व पशु-पक्षीपे्रमी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात यासाठी १७ तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांवर सकाळी ६ ते ११ वाजता दरम्यान पक्षी गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षी व त्यांच्या हालचाली टिपता याव्या यासाठी वन विभागाने पक्षीतज्ज्ञ व प्रेमींसाठी तलावाशेजारी पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच कॅमेरे व दूर्बिनसुद्धा त्यांना पुरविली जाणार आहे. काही पक्षीतज्ज्ञ व प्रेमींकडे स्वत:चे दूर्बिन असल्याचे मुख्य वन संरक्षकांनी सांगितले आहे. पक्षीगणना करण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांसह येथील सावन बहेकार, भरत जसानी, रूपेश निंबार्ते, शैलेश ठाकूर, अशोक पडोळे, आशिष वर्मा, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, अंकीत ठाकूर, महेंद्र राऊत, राजू खोडेचा, मुकूंद धुर्वे, दुष्यंत रेभे, अंकूर काळी, त्र्यंबक जरोदे, संजय आकरे, शाबाद खान, शशांक लाडेकर, मुनेश गौतम आदिंची उपस्थिती राहील. या गणनेतून परिपूर्ण अहवाल तयार करून प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविलाा जाणार आहे. (प्रतिनिधी)