शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून आदिवासी संस्था कमिशनविना

By admin | Updated: November 16, 2015 01:46 IST

मागील १५ वर्षांपासून आदिवासी संस्थांना धान खरेदीचे कमिशन देण्यात आले नाही. शिवाय संस्थांच्या अन्य समस्यांना ...

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक : कमिशन नाही तोवर धान खरेदी नाही बाराभाटी : मागील १५ वर्षांपासून आदिवासी संस्थांना धान खरेदीचे कमिशन देण्यात आले नाही. शिवाय संस्थांच्या अन्य समस्यांना घेऊन येथील आदिवासी सहकारी संस्थेसह जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या अनेक समस्या सोडविण्याच्या हेतूने जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. मात्र सभेत काही तोडगा तर निघाला नाही उलट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कमिशन मिळत नाही तोवर धान खरेदी न करण्याचा निर्णय घेत हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. या जिल्हास्तरीय बैठकीला युनियन सचिव वसंत पुराम, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धनगाये, सहसचिव हरिचंद्र कोहळे, विजय कश्यप, रमेश ताराम, कृपासागर, शिवदर्शन भांडारकर, मुलचंद गावराने, लीलाधर ताराम, अनिल दहिवले, हिरालाल उईके, बाळकृष्ण इस्कापे, सूजाण बागडेरिया, देवानंद कोचबे, बब्बु भंडारी, दयाराम कापगतेसह आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्थांचे सदस्य, संचालक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत उपस्थितांनी धानाला भाव नाही, दुष्काळी परिस्थिती असताना सरकार कमी भावात धान खरेदी करण्यास सांगत आहे. सत्तेत जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांचेही लक्ष नसल्यासह अनेक गंभीर प्रश्न संघटनेने सरकारचे प्रतिनिधी दयाराम कापगते यांच्यासमोर मांडले. परंतु या बाबींवर उत्तम तोडगा निघालाच नाही. यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्था टीडीसी, मंत्री, खासदार यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संयुक्त बैठक लावण्याची मागणी केली. विशेष म्हणजे सन २००१ पासून संस्थांना कमिशन देण्यात आले नाही, नियमानुसार सात लाखांचा बारदाना न मिळता फक्त २५-४० हजारांचा मिळतो असे अनेक विषय या बैठकीत मांडण्यात आले व त्यांना घेऊन पदाधिकाऱ्यांत नाराजगी दिसली.