अत्याचारी नराधमाला १० वर्षाचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:30+5:30

२८ मार्च २०१५ रोजी दुपारी १२ वाजता गावातच एका घरी लग्न असल्यामुळे लग्न समारंभात जाण्यासाठी ती घरुन निघाली. रस्त्यात आरोपी राकेश मधुकर हाडगे (३०, रा. खोडशिवनी) याने तिला आपल्याकडे बोलावून शेजारच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रडत-रडत घराकडे येऊन तिने हकीकत आपल्या आजीला सांगितली. त्या मुलीला घेऊन आजी घटनास्थळाकडे गेली असता आरोपी जिल्हा परिषद शाळेजवळ मिळाला.

10 years rigorous imprisonment for trespassing | अत्याचारी नराधमाला १० वर्षाचा सश्रम कारावास

अत्याचारी नराधमाला १० वर्षाचा सश्रम कारावास

ठळक मुद्देखोडशिवनी येथील घटना : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अल्पवयीन मुलीवर (१०) अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने ३० वर्षीय नराधमाला १० वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोडशिवनी येथे सन २०१५ मधील ही घटना आहे.
घाटबोरी-कोहळी येथील पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या आईच्या माहेरी खोडशिवनी येथे शिक्षणासाठी राहत होती. आजी-आजोबांसोबत राहून गावातील शाळेत ती शिक्षण घेत होती. २८ मार्च २०१५ रोजी दुपारी १२ वाजता गावातच एका घरी लग्न असल्यामुळे लग्न समारंभात जाण्यासाठी ती घरुन निघाली. रस्त्यात आरोपी राकेश मधुकर हाडगे (३०, रा. खोडशिवनी) याने तिला आपल्याकडे बोलावून शेजारच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रडत-रडत घराकडे येऊन तिने हकीकत आपल्या आजीला सांगितली. त्या मुलीला घेऊन आजी घटनास्थळाकडे गेली असता आरोपी जिल्हा परिषद शाळेजवळ मिळाला.
पिडीत मुलीने आरोपी राकेशला ओळखून याने माझ्याशी वाईट कृत्य केल्याचे सांगीतले. यासंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (१) (२) (आय) (ज) सहकलम ४, ६, ८, १०, बाललैगिंक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणावर मंगळवारी (दि.५) सुनावनी करताना आरोपी राकेश हाडगे याला जिल्हा सत्र न्यायाधीश-१ एस.एन.पराते यांनी १० वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात १० साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

तिला ही दिले होते १० रुपयांचे आमिष
सडक-अर्जुनी तालुक्यातील बिर्री-सिंदीपार येथे रविवारी (दि.३) रात्री ज्या १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तिला आरोपींनी १० रुपयांचे आमिष देऊन मंडईत नेले होते. त्याचप्रकारे सन २०१५ मध्ये खोडशिवनी येथे घडलेल्या या घटनेत आरोपी राकेश मधुकर हाडगे(३०) यानेही १० रुपये देण्याचे आमिष देऊन पिडीत मुलीवर अत्याचार केला होता. राकेशने तुझ्या शाळेचा ड्रेस शिवण्यासाठी मोजमाप दे म्हणून तिला जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला नेऊन एका गोठ्यात तिच्यावर अत्याचार केला होता. या दोन्ही घटनांमध्ये पिडीत मुलींचे वय १० वर्ष असून त्यांना १० रुपयांचे आमिष देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

Web Title: 10 years rigorous imprisonment for trespassing