नक्षल जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळाले १० कोटी

By Admin | Updated: May 10, 2014 00:22 IST2014-05-10T00:22:12+5:302014-05-10T00:22:12+5:30

जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या डावी कडवी विचार सरणीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० कोटी रूपये शासनाने गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत.

10 crore from the Center for the development of Naxal district | नक्षल जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळाले १० कोटी

नक्षल जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळाले १० कोटी

 गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या डावी कडवी विचार सरणीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० कोटी रूपये शासनाने गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या विकासाठी केंद्र शासनाची ही मदत आहे. भारत सरकारने देशातील निवडक आदिवासी व मागास जिल्ह्यांसाठी एकात्मीक कृती आराखडा कार्यक्रमात बदल करून नव्या रूपाने सन २०१३-१४ पासून डावी कडवी विचारणीग्रस्त जिल्ह्यांसाठी अतिरिक्त केंद्रीय सहाय्य देण्याचे ठरविले. यासाठी १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या उर्वरीत कालावधीत ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या केंद्रसरकारच्या योजनेत महाराष्टÑातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षाकरीता प्रत्येक जिल्ह्याला ३० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. महाराष्टÑातील या चार जिल्ह्यांसाठी १२० कोटी रूपये केंद्र शासनाकडून महाराष्टÑाला मिळणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता ४० कोटी रूपये मिळाले आहेत. यातील १० कोटी रूपये गोंदिया जिल्ह्याला मिळाले आहेत. २८ मार्च २०१४ रोजी राज्याच्या एकत्रित संचित निधीत जमा करण्यात आले आहे. ही बाब शासनानच्या विचाराधीन होती. सदर रक्कम गोंदिया जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. महाराष्टÑ शासनाच्या नियोजन विभागाने ९ मे रोजी सदर निधी दिला आहे. गोंदिया जिल्ह्याला आणखी २० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 10 crore from the Center for the development of Naxal district