शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत ‘पे पार्किंग’ चा दुसरा टप्पाही लागू होणार, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांची माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 21:57 IST

 हॉटेल व्यावसायिक किंवा टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना ‘पे पार्किंग’मध्ये सवलत देण्याची शक्यता आयुक्तांनी फेटाळून लावली.

पणजी : शहरात ‘पे पार्किंग’चा दुसरा टप्पाही लागू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या १५ तारीखपासून पहिला टप्पा सुरु झाला त्यानंतर १८ जून मार्ग तसेच शहरातील अन्य प्रमुख मार्गांवरील पार्किंग विभागातील २0 ते ३0 मोटारी मावतील एवढी जागा मोकळी झालेली आहे. शहरातील वाहतूकही सुरळीत झालेली आहे. 

रेंट ए बाइक किंवा टुरिस्ट टॅक्सीवाले आता ‘पे पार्किंग’ लागू नसलेले रस्ते अडविण्याची शक्यता आहे त्याबाबत विचारले असता आयुक्त म्हणाले की, ‘दुस-या टप्प्यात आणखी काही रस्त्यांवरही पे पार्किंग लागू केले जाईल. टप्प्याटप्प्यांनी पे पार्किंग लागू होणार आहे. लोकांच्या काही गोष्टी अंगवळणी पडणे आवश्यक आहे.’ 

 हॉटेल व्यावसायिक किंवा टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना ‘पे पार्किंग’मध्ये सवलत देण्याची शक्यता आयुक्तांनी फेटाळून लावली. ज्या जुन्या इमारती आहेत आणि बांधकामांच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्लॅनमध्ये पार्किंगची व्यवस्था दाखवलेली नसेल, तर त्यांना पे र्पाकिंग शुल्काबाबत सूट आहे. परंतु ज्यांनी पार्किंग जागेचे रुपांतर खोल्या किंवा गाळ्यांमध्ये केले असेल तर त्यांना मुभा मिळणार नाही, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, महापौरांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता असा आरोप केला की, ‘एक माजी आमदार जुनी अधिसूचना सोशल मिडियावर व्हायरल करीत आहे. ‘पे पार्किंग’चे नवे दर अधिसूचित झाल्यानंतरच आम्ही ते लागू केलेले आहेत. लोकांनी मनात गोंधळ करुन घेऊ नये.’ 

टॅग्स :Parkingपार्किंगgoaगोवा