शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी साखर कारखाना 100 वर्षे चालवा : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 14:09 IST

लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला

ठळक मुद्देलोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला. त्यानंतर अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना बंद करणार नाही असे सूतोवाच माङयाकडे केले.

पणजी : संजीवनी सहकारी साखर कारखाना हा गोव्यातील एकमेव साखर कारखाना आहे. गेली चाळीस वर्षे हा कारखाना चालला. यापुढेही शंभर वर्षे तो चालायला हवा, अशी अपेक्षा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते, विद्यमान आमदार व माजी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.संजीवनी साखर कारखाना हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार अधिकारावर असतानाच चाळीस वर्षापूर्वी सुरू केला गेला होता. ढवळीकर यांनी कारखान्याची स्थिती आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न याचा अभ्यास केला आहे.

लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला. त्यानंतर अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना बंद करणार नाही असे सूतोवाच माङयाकडे केले. मात्र पाच वर्षे आम्ही कारखाना चालवू, असे राज्यसभा खासदार व भाजप नेते विनय तेंडुलकर नुकतेच शेतक:यांशी बोलताना म्हणाले. तेंडुलकर यांचे हे विधान धक्कादायक आहे, असे ढवळीकर म्हणाले. कारखाना पाचच वर्षे का चालावा? तो पुढील शंभर वर्षे चालायला हवा. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात कारखाना सुरू झाला होता. ऊस उत्पादकांच्या काही हजार कुटूंबांची उपजिविका कारखान्यावर अवलंबून आहे. पाच कोटी रुपये खर्च करून कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचे नूतनीकरण करा किंवा नवी यंत्रसामुग्री आणा असे मी सूचविले होते. मात्र सरकार ऐकले नाही. उलट गोव्याचा ऊस परराज्यातील कारखान्याकडे पाठविला गेला. त्यावर नऊ कोटींचा खर्च करण्यात आला, असे ढवळीकर म्हणाले. कारखान्याकडे अकरा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आहे. त्या जागेत दीडशे शेड्स बांधून बेरोजगार युवकांना तिथे गाईंचे पालन करण्याचे प्रशिक्षण द्यावे. ते दुध मग कारखान्याने विकत घ्यावे. तसेच काही जागेत गाईंसाठी चारा लागवडीची व्यवस्था करावी. आत्मनिर्भर भारताच्या सूत्रच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम राबवावा असे ढवळीकर यांनी सूचविले.

टॅग्स :goaगोवाSugar factoryसाखर कारखाने