शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राणे पिता-पुत्रांची ‘नार्को टेस्ट’ करा

By admin | Updated: June 30, 2014 02:11 IST

भालचंद्र नाईक : १० कोटी लाच मागितल्याच्या आरोपावर ठाम

पणजी : काँग्रसचे आमदार विश्वजीत राणे यांनी दहा कोटी रुपये लाच मागितल्याच्या आरोपावर खाण लिजधारक दहेजा मिनरल्स कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक हे ठाम आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी अब्रु नुकसानीचा खटला घालावाच, असे आव्हान त्यांनी दिले आहे. राणे पिता-पुत्राची या प्रकरणात नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भ्रष्ट माणूस मागे पुरावा ठेवत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे परिस्थितीजन्य पुरावेही पुरेसे ठरू शकतात, असे नाईक यांचे म्हणणे आहे. वरील प्रकरणात आपली फसवणूक झालेली असून आपली मानसिक छळवणूकही झालेली आहे. उलट राणे यांनी या प्रकरणात आपल्यालाच वेडे ठरविले असल्याने त्याच वेदना आपल्या मनात असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. राणे यांनी अब्रुनुकसानीचा खटला न घातल्यास आपण भ्रष्टाचारविरोधी खटला त्यांच्यावर घालीन, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे. आपण वस्तुस्थिती उजेडात आणली असताना आपल्याला वेडे ठरविले जाते त्याबद्दलही खटला दाखल करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची तयारी दाखविल्याने नाईक यांनी त्याचे स्वागत केले आहे. याशिवाय आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एसआयटीकडे तसेच एम. बी. शहा आयोगाकडे जाण्याचाही पर्याय खुला असल्याचे त्यांनी या संदर्भातील पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)