काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ; आडणे-बाळ्ळीच्या सरपंचपदी प्रभाकर गावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:16 IST2026-04-28T12:15:28+5:302026-04-28T12:16:11+5:30

दक्षिण गोवा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

lotus blooms in congress stronghold prabhakar gaonkar become sarpanch of adane balli | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ; आडणे-बाळ्ळीच्या सरपंचपदी प्रभाकर गावकर

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ; आडणे-बाळ्ळीच्या सरपंचपदी प्रभाकर गावकर

लोकमत न्यूज नेटवर्क,  मडगाव : केपे मतदारसंघातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भाजपाने मोठी मजल मारली आहे. दोन काँग्रेस आमदारांचा प्रभाव असलेल्या आडणे-बाळ्ळी ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत पॅनेलने विजय मिळवला असून, दक्षिण गोवा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

काल सोमवारी झालेल्या या चुरशीच्या निवडणुकीत गावकर यांनी नऊपैकी पाच मते मिळवून नीळू वेळीप यांचा पराभव केला. हा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण आमदार एल्टन डिकॉस्ता आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे प्रतिनिधित्व असलेल्या क्षेत्रात भाजपा समर्थित उमेदवाराचा विजय होणे ही एक लक्षणीय राजकीय घडामोड आहे. सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रभाकर गातकर यांनी सांगितले की, काही कारणांमुळे भाजपाचे मतदार काँग्रेसकडे वळले होते, परंतु आता मी या मतदारांना पुन्हा पक्षाकडे आणेन.

कवळेकरांकडून अभिनंदन

बाळ्ळी आडणे पंचायतीच्या सरपंचपदी प्रभाकर गावकर यांची निवड झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर तसेच कुंकळ्ळीचे नगरसेवक विदेश देसाई यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
 

Web Title : कांग्रेस के गढ़ में खिला कमल; प्रभाकर गावकर बने सरपंच।

Web Summary : भाजपा ने कांग्रेस के गढ़ आडणे-बाळ्ळी ग्राम पंचायत में जीत हासिल की। भाजपा जिलाध्यक्ष प्रभाकर गावकर सरपंच चुने गए, उन्होंने नीलू वेळीप को हराया। यह जीत निर्वाचन क्षेत्र में एक महत्वपूर्ण राजनीतिक बदलाव है।

Web Title : BJP blooms in Congress stronghold; Prabhakar Gavkar elected Sarpanch.

Web Summary : BJP secured victory in the Adne-Baali Gram Panchayat, a Congress stronghold. Prabhakar Gavkar, BJP District President, won the Sarpanch election, defeating Nilu Velip. This victory marks a significant political shift in the constituency.