आरोग्य शिक्षणात गोवा आघाडीवर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:28 IST2026-05-04T12:27:33+5:302026-05-04T12:28:18+5:30

साखळी येथे पहिले सीएमई अॅकॅडमिक मीट २०२६ उत्साहात

goa at the forefront in health education said cm pramod sawant | आरोग्य शिक्षणात गोवा आघाडीवर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आरोग्य शिक्षणात गोवा आघाडीवर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: सतत वैद्यकीय शिक्षण (सीएमई) उपक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर, तंत्रज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक आपले ज्ञान अद्ययावत ठेवत असल्याने गोवाआरोग्य शिक्षण व सेवांमध्ये आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या (एसएनआय) प्रेक्षागृहात पहिले सीएमई अॅकॅडमिक मीट २०२६ उत्साहात पार पडले. या परिषदेत रेडिओलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

देशातील विविध नामांकित संस्था व तज्ज्ञांच्या सहभागामुळे रेडिओलॉजिकल सायन्सेस क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. तसेच, रेडिओलॉजी क्षेत्रातील नवा प्रवाह, तांत्रिक प्रगती आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींवर सखोल चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे गोवा सहयोगी आरोग्य शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. इंडियन सोसायटी ऑफ रेडिओग्राफर्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्सच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी सतत वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक मानदंड आणि किरणोत्सर्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्थेच्या योगदानाचे विशेष उल्लेख केले.

नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स अॅक्ट, २०२१ या कायद्याचे महत्त्व अधोरेखित करत या कायद्यामुळे सहयोगी आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम होणार आहे. रुग्ण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांनी संशोधन, कौशल्य विकास आणि नैतिक मूल्यांवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

या परिषदेमुळे ज्ञानाची देवाणघेवाण, व्यावसायिक संवाद आणि कौशल्य वृद्धी यांना चालना मिळून रेडिओलॉजी व सहयोगी आरोग्य क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळणार आहे. या कार्यक्रमास साई नसिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुर्डीकर, प्राचार्य चिन्मय पी. गाडगीळ, प्राध्यापकवर्ग, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

 

Web Title : गोवा स्वास्थ्य शिक्षा में अग्रणी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने कहा कि गोवा सतत चिकित्सा शिक्षा के माध्यम से स्वास्थ्य शिक्षा में आगे बढ़ रहा है। उन्होंने डॉक्टरों और पेशेवरों के लिए अद्यतन ज्ञान के महत्व पर जोर दिया और सहयोगी स्वास्थ्य क्षेत्र को मजबूत करने और रोगी सुरक्षा को प्राथमिकता देने में राष्ट्रीय आयोग अधिनियम की भूमिका पर प्रकाश डाला।

Web Title : Goa Leads in Health Education: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Goa is advancing in health education through continuous medical education, stated Chief Minister Pramod Sawant at the CME Academic Meet 2026. He emphasized the importance of updated knowledge for doctors and professionals, highlighting the role of the National Commission for Allied and Healthcare Professions Act, 2021 in strengthening the sector and prioritizing patient safety.