शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जि. पं. निवडणुकीवर राष्ट्रवादीचा बहिष्कार

By admin | Updated: February 22, 2015 01:28 IST

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा,

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी बांबोळी येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. प्रथमच जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय स्तरावर घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षस्तरावर या निवडणुकीत भाग घेऊ नये. भाजपने स्वत:च्या सोयीप्रमाणे मतदारसंघांची फेररचना व आरक्षण करून घेतले आहे, असा सूर बहुतेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत लावला. राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरीत्या काही मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यावा; पण पक्षाच्या निशाणीवर या निवडणुका लढवू नयेत, असा सल्ला पटेल यांनी दिला. सर्वांनी तो सल्ला मान्य केला. तथापि, राष्ट्रवादीने जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा पक्षाच्या हिताचा नाही, असे काही पदाधिकाऱ्यांना वाटते. लोकसभा निवडणूकही राष्ट्रवादीने गोव्यात लढवली नव्हती व त्यामुळे पक्षाकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिलेले नाहीत. डॉ. प्रफुल्ल हेदे, देवानंद नाईक, ट्रोजन डिमेलो, जुझे फिलिप डिसोझा, सुरेंद्र सिरसाट, अविनाश भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर हे गोव्याबाहेर असल्याने बैठकीस आले नाहीत. राष्ट्रवादीला गोव्यात बळकट करायला हवे. त्यासाठी काम करा, असा सल्ला पटेल यांनी सर्वांना दिला. काँग्रेस पक्षात तुम्ही जाऊ नका, असा सल्ला पटेल यांनी डिमेलो यांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारून पक्षबांधणी करण्यास आपण तयार आहोत, असे देवानंद नाईक यांनी बैठकीत पटेल यांना सांगितले. भास्कर जाधव यांची गोवा राष्ट्रवादीसाठी निरीक्षक म्हणून पटेल यांनी नियुक्ती जाहीर केली. दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुका पार पडल्यानंतर गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केला जाईल व त्यासाठी चाळीसही मतदारसंघांत पक्षातर्फे जनजागृती अभियान राबविले जाईल, असे पटेल यांनी सांगितले. गोव्यातील प्रादेशिक आराखडा, मायनिंग, माध्यम प्रश्न, कॅसिनो अशा विषयांवरून भाजप सरकारबाबत असंतोष असून जनजागृती अभियानातून लोकांचे लक्ष नव्याने या विषयांकडे वळविले जाईल, असे पटेल म्हणाले. (खास प्रतिनिधी)