शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीस मुकल्यात जमा

By admin | Updated: June 19, 2015 01:35 IST

पणजी : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीला (आयआयटी) गोवा जवळपास मुकल्यात जमा आहे. १५ लाख चौरस मीटर एवढी प्रचंड क्षेत्रफळाची जागा आयआयटीला दिली,

पणजी : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीला (आयआयटी) गोवा जवळपास मुकल्यात जमा आहे. १५ लाख चौरस मीटर एवढी प्रचंड क्षेत्रफळाची जागा आयआयटीला दिली, तरी गोव्याला त्यातून मोठासा लाभ होणार नाही, याची कल्पना आल्याने गोवा सरकारही आता आयआयटीबाबत जास्त गंभीर नाही, अशी माहिती मिळाली.धारगळ, खांडोळा व बेतूल-केपे अशा तीन ठिकाणी सरकारने १४ ते १५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा काही महिन्यांपूर्वी पाहिली आहे. आयआयटीच्या प्रकल्पासाठी एवढी जागा हवी आहे. यापूर्वी सरकारने धारगळमध्येच एके ठिकाणी ८ लाख चौरस मीटर जागा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवली होती. ती अपुरी पडल्याने केंद्रीय मंत्रालयाने मग आयआयटी गोव्यात सुरू करण्याबाबत जास्त रस व गांभीर्य दाखवले नाही. आयआयटीसाठी कायमस्वरूपी जागा मिळाली, तरच तात्पुरते वर्ग फर्मागुडी येथे सुरू करण्याची मंत्रालयाची तयारी होती. तथापि, कायमस्वरूपी जागा निश्चित होण्यापूर्वीच ‘तुम्ही वर्ग सुरू करा,’ अशी भूमिका गोवा सरकारनेही घेतली नाही. राज्यातील तीन ठिकाणच्या जागा पाहण्यासाठी मंत्रालयाचे अधिकारी गोव्यात पुन्हा आले नाहीत.राज्यात अगोदरच जमीन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. एसईझेडमध्ये २३ लाख चौरस मीटर जागा अडकलेली आहे. त्यामुळे एका आयआयटीसाठीच पंधरा लाख चौरस मीटर जागा का म्हणून द्यावी, असा प्रश्न गोवा सरकारलाही पडला असल्याची माहिती मिळाली. पंधरा लाख चौरस मीटर जागा देऊन आयआयटी गोव्यात उभी राहिली, तरी त्यात गोव्यातील केवळ दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. बहुतांश विद्यार्थी हे अखिल भारतीय स्तरावरील असतील. याबाबत गोवा सरकारने विचार केला आहे. त्यामुळे आयआयटी संस्था कोणत्याही प्रकारे गोव्यात यायलाच हवी, असा हट्ट आता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही धरलेला नाही. आयआयटीच्या प्रस्तावाचा केंद्रीय स्तरावर गंभीरपणे पाठपुरावा करण्याची अजून तरी गोवा सरकारची भूमिका नाही. (खास प्रतिनिधी)