विधानसभा पोटनिवडणूक: फोंड्यात भाटीकर विरुद्ध रितेश; भाजपकडून दोन दिवसांत नाव जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:54 IST2026-03-17T10:54:50+5:302026-03-17T10:54:50+5:30

ही पोटनिवडणूक भाटीकर विरुद्ध रितेश, अशीच रंगणार आहे.

assembly by election 2026 bhatikar vs ritesh in ponda bjp to announce name in two days | विधानसभा पोटनिवडणूक: फोंड्यात भाटीकर विरुद्ध रितेश; भाजपकडून दोन दिवसांत नाव जाहीर होणार

विधानसभा पोटनिवडणूक: फोंड्यात भाटीकर विरुद्ध रितेश; भाजपकडून दोन दिवसांत नाव जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. केतन भाटीकर यांचे नाव निश्चित करुन दिल्लीला पाठवले आहे. तर दुसरीकडे भाजपने दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांच्या तिकिटावर जवळजवळ शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे ही पोटनिवडणूक भाटीकर विरुद्ध रितेश, अशीच रंगणार आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज, मंगळवारी होत असून भाटीकरांचे एकमेव नाव गोव्यातून पाठवल्याने या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात आले. भाजप गोटात विश्वनाथ दळवी यांचे नाव मागे पडले असून रितेश यांना उमेदवारी पक्की झाली आहे. भाजपचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होऊ शकतो.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाटीकर यांचे एकमेव नाव आम्ही पाठवले आहे. दिल्लीत आज बैठकीत त्यावर निर्णय होईल व तेथूनच उमेदवारी जाहीर केली जाईल.

राजेश वेरेंकर हेही तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्याबद्दल विचारले असता पाटकर म्हणाले की, भाटीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वेरेंकर हे त्यांना पाठिंबा देतील. त्याबद्दल संशय बाळगण्याचे कारण नाही.

दरम्यान, डॉ. भाटीकर हे अनेक २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यानी फोंड्यातून लढवली होती परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. रवी नाईक त्यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांना ७,४३७ मते (२९.१२ टक्के) मिळाली होती तर डॉ. भाटीकर ६८३९ मतें (२८.३२ टक्के) मतें मिळवून दुसया क्रमांकावर आले होते. भाटीकर यांनी अलिकडेच २४ फेब्रुवारी रोजी मगोपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात होते.

दोन दिवसांत उमेदवार जाहीर करू : दामू नाईक

फोंडा तालुक्यातील पंचायत तसेच पालिका क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. काल फोंड्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. पक्षाकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असून पुढील दोन दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर करू, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

भाटीकरांना पाठिंबा : वेरेंकर

तिकिटासाठी इच्छुक असलेले राजेश वेर्रेकर यांनी भाटीकर यांना तिकिट दिल्यास त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. भाटीकर यांना आपला पाठिंबा असेल, असे सांगितले. ते म्हणाले की,' आमचा मुख्य हेतू भाजपला पराभूत करणे हा आहे. पक्षाचा निर्णय मी शिरोधार्ह मानीन.

रवींच्या मुलाला उमेदवारी द्या : गावडे

रवी नाईक यांच्या पुत्राला उमेदवारी द्यावी, अशी भूमिका आमदार गोविंद गावडे यांनी पुन्हा एकदा मांडली आहे. रवी नाईक यांनी फोंडा मतदारसंघासाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला संधी देणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले. रवी नाईक यांनी अनेक वर्षे फोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत विविध विकासकामे राबवली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याची परंपरा पुढे चालू ठेवता येईल.

Web Title : उपचुनाव: फोंडा में भाटीकर बनाम रितेश; भाजपा जल्द नाम घोषित करेगी

Web Summary : फोंडा उपचुनाव के लिए कांग्रेस ने भाटीकर को नामित किया; भाजपा रितेश नाइक को मैदान में उतार सकती है। भाटीकर ने 2022 में रवि नाइक से हार का सामना किया था। भाजपा दो दिनों में उम्मीदवार घोषित करेगी। वेरेकर ने भाटीकर का समर्थन किया, जबकि गावडे ने रवि नाइक के बेटे की उम्मीदवारी की वकालत की।

Web Title : Fonda By-Election: Bhatikar vs. Ritesh; BJP to Announce Name Soon

Web Summary : Congress nominates Bhatikar for Fonda by-election; BJP likely to field Ritesh Naik. Bhatikar contested in 2022, losing to Ravi Naik. BJP will announce its candidate in two days. Verenkar supports Bhatikar if nominated, while Gawde advocates for Ravi Naik's son's candidacy.