शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्त मोटर वाहन कायदा तत्काळ लागू करा, मद्यपी चालकांना रोखा - सुदिन ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:18 IST

राज्यातील रस्त्यांवर खड्डे असल्याचे कारण देऊन सरकारने मोटर वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर टाकणो हे चुकीचे आहे.

पणजी : राज्यातील रस्त्यांवर खड्डे असल्याचे कारण देऊन सरकारने मोटर वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर टाकणो हे चुकीचे आहे. सरकारने त्वरित अंमलबजावणी सुरू करावी व मद्य पिऊन वाहन चालविणा-यांना रोखावे, अशी मागणी मगो पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मोठी दंड आकारणी गरजेचीच आहे, असे ढवळीकर म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायद्यात दुरुस्त्या करून घेताना खूप कष्ट घेतले. विविध स्तरांवर खूप अभ्यास केला गेला. मी स्वत: वाहतूक मंत्री या नात्याने त्या प्रक्रियेत सहभागी झालो होतो. मी समितीचा सदस्य होतो. आम्ही अनेक बैठका घेतल्या. दंडाची रक्कम जरी मोठी असली तरी, ती कमी करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मात्र दंड कमी करण्याचीही गरज नाही. कारण राज्यात मद्य पिऊन अनेक चालक वाहन चालवितात व अपघात होतात. ढवळी उड्डाण पुलावर जे पाच अपघात झाले, त्यापैकी चार अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे झाले, असे ढवळीकर म्हणाले.याचप्रमाणे अनेक पालक अल्पवयीन मुलांना दुचाक्या चालविण्यासाठी देतात. हे सगळे प्रकार बंद होण्यासाठी केंद्रीय कायद्यातील नव्या तरतुदींची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी. रस्ते खराब आहेत, कारण पाऊस प्रचंड पडला. तथापि, येत्या नोव्हेंबर्पयत सरकारने रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत. मात्र त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी रोखून धरू नये. देशातील अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणी सुरू झाली, असे ढवळीकर यांनी सांगितले.नव्या तरतुदींमध्ये समाजाच्या विविध घटकांची काळजी घेण्यात आली आहे. वाहन अपघातात बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना किमान पाच लाख रुपये मिळतील अशी तरतुद आहे. पूर्वी काहीच मिळत नव्हते. डिलरने जर सदोष वाहन विकले तर ते वाहन परत डिलरला देण्याचीही तरतुद आहे. रस्त्यांवरील खड्डे हा वेगळा विषय असून त्याचा संबंध नव्या कायद्याशी कुणी लावू नये. केंद्राने एका रात्रीत तो कायदा आणलेला नाही, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाtraffic policeवाहतूक पोलीस