मगरीच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

By Admin | Updated: June 10, 2015 01:55 IST2015-06-10T01:55:49+5:302015-06-10T01:55:49+5:30

तालुक्यातील बोरी जवळील प्राणहिता नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकावर मगरने हल्ला केल्याने युवक गंभीररीत्या जखमी झाला.

The young man seriously injured in a crude attack | मगरीच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

मगरीच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

अहेरी : तालुक्यातील बोरी जवळील प्राणहिता नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकावर मगरने हल्ला केल्याने युवक गंभीररीत्या जखमी झाला. सदर घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
मुक्ता शामराव बट्टीवार (२२) रा. रामपूर असे जखमी युवकाचे नाव आहे. मुक्ता हा प्राणहिता नदीत मासे पकडण्यासाठी गेला असता, जवळपास १५ फूट लांब असलेल्या मगरीने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याचा उजवा पाय पकडून गंभीररीत्या जखमी केले. मात्र सदर युवकाने प्रतिकार करून मगरीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. हल्ल्याची माहिती बोरीचे गृहरक्षक सोहेल पठाण व गावकऱ्यांना माहीत होताच त्यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला बोलाविले. प्रथमोपचार करून त्याला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. सदर गाव वन विभाग आलापल्लीच्या परिक्षत्रात येते. विशेष म्हणजे, या आदी साईनाथ टेकुलवार या युवकावर मगरीने हल्ला करून त्याला जखमी केले होते.
या नदीत गावातील नागरिक व जनावरे जात असल्याने वन विभागाने पुढील धोका टाळण्यासाठी सदर मगरचा बंदोबस्त करावा. मुक्ता बट्टीवार याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च देऊन त्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी रामपूरच्या पोलीस पाटील लचमा मुक्ता पानेम यांच्यासह नागरिकांकडून होत आहे. या पूर्वीही अहेरी तालुक्यात गतवर्षी मगरीने एका इसमावर हल्ला केला होत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The young man seriously injured in a crude attack