शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाविरुद्ध लढणाऱ्या ७५ याेद्ध्यांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यासाठी १२ हजार लस जिल्ह्यात उपलब्ध झाल्या होत्या. ...

कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यासाठी १२ हजार लस जिल्ह्यात उपलब्ध झाल्या होत्या. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ही लस देण्यास सुरुवातही झाली होती. मात्र कोरची तालुक्यातील कोरोना काळातील आरोग्य योद्ध्यांना ही लस केव्हा देणार याची प्रतीक्षा होती. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली चामोर्शी अहेरी आरमोरी व वडसा धानोरा कुरखेडा या तालुक्यांत टप्प्याटप्प्याने लस वितरण करून लस देण्यास सुरुवात झाली होती. १ फेब्रुवारीपासून ग्रामीण रुग्णालय कोरची येथेही कोविड लस देण्यास सुरुवात झालेली आहे.

कोविड लस ठेवण्यासाठी नवीन शीतसाखळी उपकरण कोरची ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यासाठी पाठविण्यात आलेले होते; मात्र काही कारणास्तव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ते शीतसाखळी उपकरण जिल्ह्यात परत पाठवले होते. याबाबत ‘लोकमत’ने २९ जानेवारीला बातमी प्रकाशित केली. या वृत्ताची दखल घेत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ याबाबतची सुविधा करून ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसांत लस देण्याची सुविधा करून १ फेब्रुवारीपासून ही कोविड लस देण्यास सुरुवात केलेली आहे. ही कोरोनाची लस आरोग्य तालुक्यात कोरोना योद्धा म्हणून कार्य केलेल्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरची ग्रामीण रुग्णालयात ही लस १ फेब्रुवारीपासून लावण्यास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी ७५ कोरोना योद्ध्यांनी ही लस लावून घेतली आहे. ही लस प्रत्येक दिवशी शंभर कोरोना योद्ध्यांना लावण्यात येणार असून, प्रथम टप्प्यात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात देण्यात येणारे आरोग्य कर्मचारी हे ५८० च्या वर असून, ही लस मोहीम प्रथम टप्प्यात सहा दिवस चालणार आहे. रविवारी व मंगळवारी लस मोहीम बंद असल्याची माहिती मिळाली आहे. १ फेब्रुवारीपासून ही लस लावण्यास सुरुवात झाली असून, ही लस कोरची ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांच्यापासून देण्यास सुरुवात झाली.

या वेळी तहसीलदार छगनलाल भंडारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्यामलाल मडावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे, डॉ. आशिष इटनकर, नंदकिशोर वैरागडे, शालीकराम कराडे, आशिष अग्रवाल व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पहिला टप्पा आटोपल्यानंतर नगरपंचायतचे कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. लस देण्याकरिता नाव नोंदणी मोहीम ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण देशभर राबविली जात आहे. कोरची तालुक्यातील एकमेव बीएसएनएल इंटरनेट सेवा असल्याने ती कासवगतीने सुरू आहे. या बीएसएनएलच्या इंटरनेटमुळे तालुक्यातील ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात अनेक अडचणी येत असल्याचेही दिसून येत आहे.

बाॅक्स

लस पूर्णत: सुरक्षित

लस लावण्याची मोहीम कोरची तालुक्यात सुरू करण्यात आली असून, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले नाव नोंदवून ही लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे यांनी केले आहे.