शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम ही कंपनी स्थापन केली.

ठळक मुद्दे२.२९ कोटींनी फसवणूक : मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुंतवणुकीवर दाम दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली ग्राहकांची २ कोटी २९ लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ फेब्रुवारी रोजी अटक केल्याची माहिती पोलीस विभागाकडून सोमवारी सायंकाळी देण्यात आली.रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम ही कंपनी स्थापन केली. या कंपनीची शाखा गडचिरोली येथे एप्रिल २०१२ मध्ये उघडली. नागरिकांकडून रक्कम गोळा करण्यासाठी ५१ अभिकर्ते नेमले होते. कमी कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष अभिकर्त्यांमार्फत ठेवीदारांना देण्यात आले. त्यामुळे ठेवीदारांनी कंपनीकडे रक्कम गुंतवली. जिल्ह्यातील २ हजार १३७ ठेवीदारांनी २ कोटी २९ लाख ३ हजार ४९० रुपये सदर कंपनीकडे जमा केले होते. मात्र आॅक्टोबर २०१५ मध्ये या कंपनीने कार्यालय बंद करून ठेवीदारांची रक्कम परत केली नाही. ठेवीदारांच्या तोंडी रिपोर्टवरून कंपनीच्या संचालकांविरूध्द गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामचंद्र नायक व किसनलाल मेरावत दोन आरोपींना अटक केली आहे.सदर कारवाई पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलीस निरिक्षक विक्रांत सगणे, पोलीस हवालदार नरेश सहारे, भाऊराव बोरकर, सत्यम लोहंबरे, समय्या कासेट्टीवार, माणिक दुधबळे, माणिक निसार आदी उपस्थित होते.फसवणूक झालेल्यांनी संपर्क करावापैसे दामदुप्पट होण्याच्या आमिषाने अनेकांनी सनशाईन कंपनीमध्ये गुंतवणूक केली. पण ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरिक्षक विक्रांत सगणे यांनी केले आहे.

 

टॅग्स :Thiefचोर