मून व बघेले यांना दोन दिवसांची कोठडी

By Admin | Updated: July 24, 2015 01:37 IST2015-07-24T01:37:41+5:302015-07-24T01:37:41+5:30

शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेला लेखाधिकारी मनोजकुमार मून

Two-day stay on Moon and Baghelay | मून व बघेले यांना दोन दिवसांची कोठडी

मून व बघेले यांना दोन दिवसांची कोठडी

शिष्यवृत्ती घोटाळा : शहाबाज हैदर अजूनही फरारच
गडचिरोली : शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेला लेखाधिकारी मनोजकुमार मून व प्रितमसिंग बघेले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर वैशाली टेंभूर्णे हिला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने बुधवारी सुनावली आहे.
शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी असलेला अधिकारी दत्तात्रय राठोड, संस्थाचालक शहाबाज हैदर व विघ्नोज राजूरकर हे तिघेही फरार आहेत. शहाबाज हैदर याला २१ जुलैपर्यंत अटक करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र कालावधी संपूणही हैदर अजूनही पोलिसांना शरण आला नाही. गुरूसाई संस्थेचा संस्थाचालक भरत टोकलवार याच्या विरोधात आष्टी येथे आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आधारावर टोकलवारची पोलीस कोठडी न्यायालयाने वाढवून दिली आहे. त्याची पत्नी भाग्यश्री टोकलवार ही अजूनही फरार आहे. वैशाली टेंभूर्णेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत ३० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी व संस्थाचालकांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध विशेष पोलीस पथक घेत असल्याची माहिती तपास अधिकारी रवींद्र पाटील यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two-day stay on Moon and Baghelay