१० महिन्यानंतर शाळांमध्ये किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:02+5:302021-02-05T08:50:02+5:30

दरम्यान सर्व शिक्षकांची आधीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात केवळ १६ शिक्षकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व ...

Twitching in schools after 10 months | १० महिन्यानंतर शाळांमध्ये किलबिलाट

१० महिन्यानंतर शाळांमध्ये किलबिलाट

दरम्यान सर्व शिक्षकांची आधीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात केवळ १६ शिक्षकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षकांनी शाळेवर हजेरी लावली होती. काही ठिकाणी वर्गही सुशोभित करण्यात आले होते. सर्वाधिक ७२ टक्के विद्यार्थी उपस्थिती कुरखेडा तालुक्यात तर सर्वात कमी १० टक्के शालेय उपस्थिती भामरागड तालुक्यात होती.

शासनाच्या आदेशानुसार वैरागड येथील जि.प.मुलांची शाळा सुरू करण्यात आली. निर्देशानुसार सगळी जबाबदारी घेऊन प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या. विद्यार्थ्यांची ८० टक्के उपस्थिती होती. शाळा सुरू झाल्याचा उत्साह त्यांच्यात दिसत होता.

- टी.वाय.आखरे

शिक्षक, वैरागड

१० महिन्यानंतर शाळा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ७० टक्के मुलांची उपस्थिती होती. त्यात मुलींची उपस्थिती जास्त होती. विद्यार्थ्यांना कोरोनासंबंधीचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.

- संजय उराडे,

मुख्याध्यापक, जि.प.शाळा इल्लूर

कोरोनामुळे आमची शाळा बंद होती. घरचा अभ्यास या नावाने व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून शिक्षक वर्ग घेत होते, पण जास्त समजत नव्हते. काही वेळा शिक्षकांनी घरी येऊनही समजावले. पण आता शाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला सर्व समजेल.

- प्रिया पेमंदास जेठूमल

विद्यार्थिनी, बोटेकसा

कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेस घेतले जात होते. पण अनेक वेळ नेटवर्क प्रॉब्लेम येत होता. प्रत्यक्ष वर्गात शिकल्याने जास्त चांगले समजते. त्यामुळे कधी वर्ग सुरू होतात याची प्रतीक्षा होती. आज खूप आनंद झाला. आता सर्व वर्गमित्रांची भेट आणि खेळणेही शक्य होईल.

सोहम गड्डमवार

विद्यार्थी, गडचिरोली

Web Title: Twitching in schools after 10 months