तीन दिव्यांग जाेडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST2021-04-13T04:35:02+5:302021-04-13T04:35:02+5:30

साेहळ्याला आ.कृष्णा गजबे, अभियंता विजय मेश्राम, मारोतराव जांभुळकर, श्यामला राऊत, ममता जांभुळकर, संस्था अध्यक्ष वर्षा प्रमोद नांदगावे, दशरथ ...

Three Divyang ZP married | तीन दिव्यांग जाेडपी विवाहबद्ध

तीन दिव्यांग जाेडपी विवाहबद्ध

साेहळ्याला आ.कृष्णा गजबे, अभियंता विजय मेश्राम, मारोतराव जांभुळकर, श्यामला राऊत, ममता जांभुळकर, संस्था अध्यक्ष वर्षा प्रमोद नांदगावे, दशरथ धोंगडे उपस्थित होते. या प्रसंगी आ.गजबे यांनी दिव्यांग हा समाजाचा उपेक्षित घटक समजणे योग्य नाही. समाजातील विविध क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती मोलाची कामगिरी बजावतात. शारीरिक विकलांगतेमुळे सामान्य माणसाप्रमाणे दिनचर्या करणे दिव्यांग व्यक्तींसमोर मोठे आव्हान असले, तरी त्यांना सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या प्रवाहात सामावून घेणे सर्वांची जबाबदारी आहे. त्यांना सुखी-समृद्ध व वैवाहिक जीवन जगता यावे, यासाठी संस्थेच्या वतीने आयोजित केलेले सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन प्रशंसनीय असून, अशा कार्यक्रमांसाठी नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन आ.गजबे यांनी केले.

===Photopath===

120421\12gad_16_12042021_30.jpg

===Caption===

दिव्यांग जाेडप्याला भेटवस्तू देताना आ. कृष्णा गजबे.

Web Title: Three Divyang ZP married