शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही

By admin | Updated: October 27, 2016 01:46 IST

स्थानिक पंचायत समितीअंतर्गत लखमापूर बोरी केंद्राअंतर्गत असलेल्या मुरखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गेल्या पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही.

शिक्षकांची तीन पदे रिक्त : मुरखळा जि. प. शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळचामोर्शी : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत लखमापूर बोरी केंद्राअंतर्गत असलेल्या मुरखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गेल्या पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही. मुख्याध्यापकांसह पदवीधर शिक्षक व इतर मिळून एकूण शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्याने या शाळेत शिक्षणाचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे.मुरखळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून येथे सर्व वर्गाची मिळून २४४ विद्यार्थी पटसंख्या आहे. सदर शाळेत शिक्षकांची १० पदे मंजूर आहेत. मात्र पदवीधर शिक्षकांचे वर्षभरापासून रिक्त असून मुख्याध्यापक व अन्य एक असे एकूण शिक्षकांचे तीन पदे रिक्त आहेत. सध्या या शाळेत सात शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विषयनिहाय शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या शाळेत आणखी तीन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व पालकांनी केली आहे.सदर शाळेचा डोलारा प्रभारी मुख्याध्यापकावर पाच वर्षांपासून सुरू आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देऊन शैक्षणिक समस्या अवगत करून दिली. मात्र सदर शाळेत नव्या शिक्षकांची नियुक्ती करण्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे. तत्काळ येथे शिक्षक देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)