जयरामपूर नदी घाटातून १,०७४ ब्रास रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:36+5:30

जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महिला तलाठी एल. एस. होळी यांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी धाड टाकून रेतीने भरलेले सात हायवा ट्रक व नदी पात्रातील तीन पोकलँड मशीन जप्त केल्या.

Theft of 1074 brass sand from Jairampur River Ghat | जयरामपूर नदी घाटातून १,०७४ ब्रास रेतीची चोरी

जयरामपूर नदी घाटातून १,०७४ ब्रास रेतीची चोरी

ठळक मुद्देतहसीलदारांकडे अहवाल : जुन्या कंत्राटदाराचा चोरीत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : वैनगंगा नदीच्या जयरामपूर रेती घाटावरून सुमारे १ हजार ७४ ब्रॉस रेतीची चोरी करण्यात आली असल्याचे महसूल विभागाने केलेल्या मोजणीत आढळून आले आहे. सदर कंत्राटदारावर १ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महिला तलाठी एल. एस. होळी यांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी धाड टाकून रेतीने भरलेले सात हायवा ट्रक व नदी पात्रातील तीन पोकलँड मशीन जप्त केल्या.
दुसऱ्या दिवशी मंडळ अधिकारी राऊत, तलाठी सी. डी. नाईक यांनी नदी पात्राचे मोजमाप केले असता, सुमारे १ हजार ७४ ब्रॉस रेतीची चोरी झाल्याचे आढळून आले. एका रेती ब्रॉसवर १२ हजार ३०० रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार रेतीची किंमत १ कोटी ३२ लाख रुपये एवढी होते. मंडळ अधिकाऱ्यांनी मोजमाप करून अहवाल चामोर्शी तहसीलदारांकडे सादर केला आहे. रेती चोरीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. नियमानुसार रेती तस्करावर दंड आकारला जाण्याची अपेक्षा आहे. ट्रकवर प्रत्येकी दोन लाख रुपये दंड तसेच पोकलँडवरही दंड आकारला जाणार आहे. मोजणी करतेवेळी सहायक पोलीस निरिक्षक धमेंद्र मडावी, संघरक्षीत फुलझेले हजर होते.

Web Title: Theft of 1074 brass sand from Jairampur River Ghat

टॅग्स :sandवाळू