शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडवासीयांचा संघर्ष व वनवास यावर्षीही कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडीया नदी आहे. तसेच गावालगत पर्लकोटा नदी वाहते. पर्लकोटा नदीच्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यातल्या त्या कोरोना संचारबंदीमुळे पुलाच्या कामाला ब्रेक लावला. दोन्ही ठेंगण्या पुलाचा प्रश्न कायम असल्याने याही वर्षी भामरागड तालुक्यातील नागरिकांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यात सहन कराव्या लागतात नरकयातना : पर्लकोटा व बांडिया नदीवरील ठेंगण्या पुलाची समस्या ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका हा नैसर्गिक सौंदर्य व साधनसंपत्तीने औतपोत भरलेला आहे. मात्र पर्लकोटा व बांडीया या दोन्ही नद्यांवर ठेंगणे पूल असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पावसाळ्यात शेकडो गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटणार आहे. शिवाय भामरागड शहरासह तालुक्यातील कित्येक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे.भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडीया नदी आहे. तसेच गावालगत पर्लकोटा नदी वाहते. पर्लकोटा नदीच्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यातल्या त्या कोरोना संचारबंदीमुळे पुलाच्या कामाला ब्रेक लावला. दोन्ही ठेंगण्या पुलाचा प्रश्न कायम असल्याने याही वर्षी भामरागड तालुक्यातील नागरिकांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत. बांडीया नदीच्या पुरामुळे गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत पावलेल्या इसमाचा मृतदेह गावी पोहोचू शकला नाही. दोन्ही नदीच्या पुलावर पावसाळ्यात पाणी राहते. तसेच नद्या दुथडी भरून वाहत असतात. परिणामी बांडिया नदीच्या पुरामुळे १२८ गावांचा संपर्क तुटतो. तर पर्लकोटा नदीला पूर आल्यानंतर ८० गावांचा जिल्हा मुख्यालय व जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे येथे मोठ्या व उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे व तशी मागणी भामरागड शहरातील नागरिकांनी केली आहे. नागरिकही पुनर्वसनासाठी तयार आहेत. त्यामुळे पुलाचे काम करण्यासाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा त्यांना निवेदने दिले आहेत.तहसीलदारांनी केली पर्लकोटा नदीची पाहणीतहसील कार्यालय भामरागडच्या वतीने पावसाळ्यातील पूर परिस्थिती व आपत्तीचे व्यवस्थापन करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने भामरागडचे प्रभारी तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश पुप्पुलवार यांनी पर्लकोटा नदी व त्यावरील पुलाची पाहणी केली. यावेळी अनमोल कांबळे व महसूल कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी सतर्क राहण्यास त्यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरriverनदी