शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा जण कोरोनामुक्त; तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

मुलचेरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २० जनांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सात अहवाल नेगेटिव्ह तर एका जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ अहवाल अप्राप्त आहेत. पॉझिटिव्ह असलेला व्यक्ती मुख्याधिकारी यांचा चालक आहे.

ठळक मुद्दे९४ जन अ‍ॅक्टिव्ह : मुलचेरा येथील मुख्याधिकाऱ्यांच्या चालकाचाही अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालांनुसार सहा रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन सीआरपीएफ जवान व मुलचेरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या खासगी चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ९४ झाली आहे.
कोरोनातून मुक्त झालेल्यांमध्ये गडचिरोली व अहेरी येथील प्रत्येकी दोन तर धानोरा व चामोर्शी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. गडचिरोली व अहेरी येथील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या प्रत्येकी एका सीआरपीएफ जवानाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुलचेरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २० जनांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सात अहवाल नेगेटिव्ह तर एका जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ अहवाल अप्राप्त आहेत. पॉझिटिव्ह असलेला व्यक्ती मुख्याधिकारी यांचा चालक आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या इतरही कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनापासून मुक्त झालेल्यांना घरी सोडताना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, सहायक अधिसेवक शंकर तोगरे उपस्थित होते. जिल्हाभरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १६६ झाली आहे. ९४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ७१ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या