शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

सातपुते यांचे शेत गावालगतच असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर व बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्यासभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सातपुते यांनी आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने सातपुते यांनी लगबगीने बकऱ्या व बैल गोठ्यात बांधले आणि ते घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गोठ्याला आग लागली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या खंडाळा प्रकाश डोपाजी सातपुते या शेतकऱ्याच्या गोठ्याला गुरुवारच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय एक बोकड आणि दोन बैल गंभीरपणे भाजले गेले. या भीषण आगीत शेतीची अवजारे व कीटकनाशक औषधीही जळून खाक झाली.ऐन खरीप हंगामात सातपुते या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेत सुमारे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले आहे. सातपुते यांचे शेत गावालगतच असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर व बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्यासभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सातपुते यांनी आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने सातपुते यांनी लगबगीने बकऱ्या व बैल गोठ्यात बांधले आणि ते घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गोठ्याला आग लागली.शेतकऱ्याच्या तक्रारीवरून दोठकुलीच्या सरपंच जया सातपुते यांनी पंचनामा केला. यावेळी साक्षीदार म्हणून पं.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ.सागर डुकरे तसेच श्रीरंग बालाजी बोदलकर, केशव सखाराम सातपुते, मनोहर सखाराम सातपुते हे उपस्थित होते. ऐन शेतीच्या हंगामात प्रकाश सातपुते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आता हंगाम कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शासनाने या शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच व गावांतील नागरिकांनी केली आहे.

मध्यरात्री संपूर्ण गाव धावले मदतीला- भडकलेल्या आगीच्या ज्वाला पाहून संपूर्ण  गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यात सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. गोठ्यातील कृषी अवजारे, किरकोळ असलेले शेतीचे साहित्यसुध्दा या आगीत भस्मसात झाले.- आग विझवण्यासाठी गावातील नागरिक व स्वतः सातपुते यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवण्यासाठी गेलेले प्रकाश सातपुते यांना आगीचे चटके बसून तेसुध्दा गंभीर जखमी झाले. सकाळी सहायक पशुधन विकास अधिकारी डी.जी.देवारे यांनी गावात येऊन जखमी असलेल्या जनावरांवर तात्पुरता इलाज केला. आ.डाॅ. देवराव हाेळी यांनीही शुक्रवारी भेट देऊन सांत्वन केले.

 

टॅग्स :fireआग