शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

पहिला व दुसरा डाेज मिळून ४८ हजारवर नागरिकांनी लसीकरण केले आहे. लसीकरण माेहिमेत तरूणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे दिसून येते. गडचिराेली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग मिळून एकूण ६७ काेराेना लसीकरण केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवरून लसीकरणाची माेहीम सुरू  आहे. जिल्ह्यात १० हजार ७८६ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाच्या पहिल्या डाेजचा लाभ घेतला तर १० हजार १६३ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. 

ठळक मुद्दे६७ केंद्रांवरून सुरू आहे माेहीम : काेराेनाची दुसरी लाट थाेेपविण्यासाठी यंत्रणा सज्ज

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली असून ही लाट  थाेपविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहेत. साेबतच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण माेहिमेला वेग देण्यात आला आहे. पहिला व दुसरा डाेज मिळून ४८ हजारवर नागरिकांनी लसीकरण केले आहे. लसीकरण माेहिमेत तरूणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे दिसून येते. 
गडचिराेली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग मिळून एकूण ६७ काेराेना लसीकरण केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवरून लसीकरणाची माेहीम सुरू  आहे. जिल्ह्यात १० हजार ७८६ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाच्या पहिल्या डाेजचा लाभ घेतला तर १० हजार १६३ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. 
लसीकरणासाठी हेल्थकेअर वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक पुढे येत आहेत. ४५ पेक्षा  अधिक वय असणाऱ्या नागरिकांनी काेविड लसीकरण करून घ्यावे, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार सांगितले जात आहे. काही सुज्ञ नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले. काेविडचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहेत. 

गडचिराेली तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण अधिक

 काेविड लसीकरणात गडचिराेली शहर व तालुका आघाडीवर आहे. दाेन्ही डाेज मिळून आतापर्यंत तालुक्यात एकूण ८ हजार ३०९ जणांनी काेराेनाची लस घेतली. आराेग्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, पत्रकार आदींनी तालुक्यात लस घेतलेली आहे.
 जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली आराेग्य विभागाचे अधिकारी लसीकरण माेहिमेवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांना यशस्वीरित्या लस देत आहेत. 

काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, झाला तरी त्याचा फारसा परिणाम आराेग्यावर हाेणार नाही, याकरिता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गडचिराेली जिल्ह्यात एकूण ६७ लसीकरण केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून माेहीम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक व ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी केंद्रावर जाऊन काेविड लसीकरण करून घ्यावे.
- डाॅ.समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली

ग्रामीण भागात उत्साह अधिक

काेराेना लसीकरणासाठी ग्रामीण भागातील नागरिक अधिकाधिक पुढे येत असून त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. शहरी भागातील लाेक काेविड लसीकरण करून घेत असले तरी त्यांच्या मनावर थाेडीशी भीती असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात कार्यरत आराेग्य विभागाचे कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी उत्साहीपणे काेविड लसीकरण करून घेत आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिराेली शहरात शासकीय चार व खासगी दाेन अशा सहा ठिकाणी काेविड लसीकरणाची व्यवस्था आहे. लाेकांचा अधिकाधिक संपर्क येणाऱ्या व्यक्तींनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस