शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने सोडे केंद्रावरील हजारो क्विंटल धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

धानोरा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सोडे येथील केंद्रावर आविका संस्थेमार्फत ९ डिसेंबर २०१९ पासून धानाची खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ४७८ शेतकऱ्यांच्या एकूण १२ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १६०० क्विंटल धानाची उचल महामंडळामार्फत भरडाईसाठी करण्यात आली.

ठळक मुद्देमहामंडळासह शेतकऱ्यांचे नुकसान । उचल कार्यवाहीस विलंब, ताडपत्र्या अपुऱ्याच

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने सोडे येथील केंद्रांवर धानाची खरेदी सुरू आहे. येथे गोदामाची व्यवस्था नसल्याने केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकून धान ठेवण्यात अले होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे उघड्यावरील धानाचे पोते भिजले. त्यामुळे महामंडळासह शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
धानोरा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सोडे येथील केंद्रावर आविका संस्थेमार्फत ९ डिसेंबर २०१९ पासून धानाची खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ४७८ शेतकऱ्यांच्या एकूण १२ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १६०० क्विंटल धानाची उचल महामंडळामार्फत भरडाईसाठी करण्यात आली. २१ मार्चपर्यंत सदर केंद्राच्या परिसरात उघड्यावर ११ हजार ६४ क्विंटल धान ठेवण्यात आले होते. महामंडळाने धानावर झाकण्यासाठी सात ताडपत्र्या उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र येथे धानाची आवक लक्षात घेता या ताडपत्र्या अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. मेघगर्जना व गारपीटसह अवकाळी वादळी पावसाने धानोरा शहर व तालुक्याला झोडपले. या वादळामुळे सोडे केंद्राच्या परिसरात धानावर झाकून ठेवलेल्या ताडपत्र्या उडाल्या. परिणामी पावसाने धानाचे पोते भिजले.
सदर केंद्रावर सोडे, नवरगाव, राजोली, पुसावंडी, चिचोली, वाघभुमी, जेवलवाही, मिचगाव बु. येरंडी, मिचगाव खु., बुरानटोला, देऊळगाव, गुजनवाडी, रोटारीटी, भुसूमकुडो आदी १५ गावातील जवळपास एक हजार शेतकरी दरवर्षी आपले धान विक्रीसाठी आणतात. १५ गावासाठी असलेले या केंद्रावर गोदामाची सुविधा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :RainपाऊसMarket Yardमार्केट यार्ड