अवकाळी पावसामुळे धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:14+5:30

घोट परिसरात यावर्षी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी धानाची आवकही मक्केपल्लीच्या केंद्रावर वाढली. येथे धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने गोदाम पूर्णत: धानाने भरले आहे. धान केंद्रावर खरेदीसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही. आता केंद्रालगत असलेल्या बाजारवाढीमध्ये धानाची खरेदी सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळ व गारपीटसह अवकाळी पाऊस बरसला.

The rains | अवकाळी पावसामुळे धान भिजले

अवकाळी पावसामुळे धान भिजले

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : मक्केपल्ली केंद्रावर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत घोटवरून ११ किमी अंतरावर असलेल्या मक्केपल्ली येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जाते. शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीसाठी या केंद्राच्या परिसरात आणून ठेवले. मात्र मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस बरसरला. यामुळे धानाचे पोते भिजून शेतकºयांचे नुकसान झाले.
घोट परिसरात यावर्षी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी धानाची आवकही मक्केपल्लीच्या केंद्रावर वाढली. येथे धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने गोदाम पूर्णत: धानाने भरले आहे. धान केंद्रावर खरेदीसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही. आता केंद्रालगत असलेल्या बाजारवाढीमध्ये धानाची खरेदी सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळ व गारपीटसह अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे केंद्र परिसरात असलेले पोेत्यातील धान काही प्रमाणात भिजले. सदर भिजलेल्या धानाची आविका संस्थेने खरेदी करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे आविका संस्थेलाही फटका बसला.

Web Title: The rains