शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही

गडचिरोली : चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही उपलब्ध करून दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. खरीप पिकाचे १ लाख ४९ हजार २६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापूर्वी शेतकरी खरीप हंगामातच पीक घेत होते. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर, पाणीपंप, डिझेल इंजिन व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी वर्गास सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिके घेण्याकडे कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात रबी हंगामाचे २३ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. कमी सिंचनात चांगले पीक येतील अशा वाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्याचबरोबर कोणत्या जमीनीमध्ये कोणते पिक घ्यावे, याबद्दही मार्गदर्शन केले जात असल्याने रबी हंगामाचे क्षेत्र दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते. यावर्षी सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गहू १ हजार ५४५ हेक्टर, ज्वारी ७ हजार हेक्टर, संकरीत मका ५ हजार ३१०, हरभरा ७ हजार ६६०, लाखोळी १७ हजार ६५०, मुंग १ हजार ८००, जवस ५ हजार ६५५, तीळ २ हजार ५७५, सूर्यफुल २४०, करडई ५०, भुईमूग ६०० व मोहरी पिकाची २०० हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. यासाठी ५ हजार ७१७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. रब्बी बियाणांची पेरणी आॅक्टोबर महिन्यामध्ये केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा जाणवणार नाही. याची पूर्ण खबरदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. एक महिन्यापूर्वीच दमदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग रबी पिकासाठी जमीन तयार करण्याच्या कामाला लागला आहे. लाखोळी, मूग, हरभरा व गहू या पिकांचे उत्पादन धानाच्या बांधीतच घेतले जाते. त्यामुळे या पिकांची पेरणी आॅक्टोबरच्या शेवटी केली जाणार आहे. कृषी विभागाने मात्र आधीच नियोजन केले आहे. (नगर प्रतिनिधी)