शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कर्मचारी संघटनेसह प्रलंबित मागण्यांबाबत एकदाही अधिकृत चर्चा झाली नाही. कार्यकुशल शासनाकडून कर्मचाऱ्यांना सकारात्मक अपेक्षा आहेत. राष्ट्रीय पेंशन याेजना बंद करून जुनी पेंशन याेजना लागू करावी, जानेवारी, २०२० पासून थकीत असलेला महागाई भत्ता व इतर भत्ते मंजूर करावी, सातव्या वेतन आयाेगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करावी यासह इतर अनेक मागण्यांचे निवेदन दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी महासंघाच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांनी ११ ऑगस्ट बुधवार हा चेतना दिन पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कर्मचारी संघटनेसह प्रलंबित मागण्यांबाबत एकदाही अधिकृत चर्चा झाली नाही. कार्यकुशल शासनाकडून कर्मचाऱ्यांना सकारात्मक अपेक्षा आहेत. त्यामुळे ११ ऑगस्ट चेतना दिन पाळून प्रतिनिधिक कृती केली. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम राेहणकर, उपाध्यक्ष संजय खाेकले, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रक एस.के. चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतीफ पठाण, सरचिटणीस किशाेर साेनटक्के, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, काेषाध्यक्ष खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, एस.के. बावणे, विवेक दुधबळे, किशाेर मडावी, महेंद्र वट्टी आदी उपस्थित हाेते. विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले. राष्ट्रीय पेंशन याेजना बंद करून जुनी पेंशन याेजना लागू करावी, जानेवारी, २०२० पासून थकीत असलेला महागाई भत्ता व इतर भत्ते मंजूर करावी, सातव्या वेतन आयाेगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करावी यासह इतर अनेक मागण्यांचे निवेदन दिले.

 

टॅग्स :agitationआंदोलनEmployeeकर्मचारी