शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 20:43 IST

मात्र ऐच्छिक ठिकाण तर दूर, कुठेही द्या, पण बदली करा, असे ‘मूक आर्जव’ करण्याची वेळ या भागातील पोलीस अधिका-यांवर आली आहे.

गडचिरोली : राज्यात पोलीस विभागासाठी सर्वाधिक धोकादायक क्षेत्र म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील सेवेकडे पाहिले जाते. कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीसाठी सदैव तत्पर राहाव्या लागणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा हा खडतर काळ पूर्ण केल्यानंतर ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्याची तरतूद शासनाने केली आहे. मात्र ऐच्छिक ठिकाण तर दूर, कुठेही द्या, पण बदली करा, असे ‘मूक आर्जव’ करण्याची वेळ या भागातील पोलीस अधिका-यांवर आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुके वगळता इतर ८ तालुके नक्षल कारवायांसाठी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील आहेत. नक्षलविरोधी अभियानासाठी नव्या दमाचे तरुण अधिकारी हवेत म्हणून नवप्रशिक्षित पोलीस उपनिरीक्षकांची संपूर्ण तुकडीच दर दोन ते अडीच वर्षांनी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात पाठविली जाते. याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक, निरीक्षक, राज्य पोलीस सेवेतील उपअधीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील बहुतांश अधिका-यांना सुरुवातीला याच जिल्ह्यात सेवा द्यावी लागते.सध्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील अडीच वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झालेले १४९ पोलीस उपनिरीक्षक, ३१ सहायक पोलीस निरीक्षक आणि काही निरीक्षक व उपअधीक्षक बदलीची प्रतीक्षा करत आहेत. मात्र सुरुवातीला कोरोना काळामुळे त्यांची बदल्यांची फाईल थांबवण्यात आली. आता इतर विभागांसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या होत आहेत. मात्र कनिष्ठ अधिका-यांना ताटकळत ठेवण्यात आल्याने त्यांच्यासह राज्याच्या विविध भागात राहणा-या त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती विचलित होत आहे.>बदल्यांसाठी ‘तारीख पे तारीख’अनेक अधिका-यांचा कार्यकाळ मे महिन्यातच पूर्ण झाला. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत बदल्या होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ५ ऑगस्ट, १० ऑगस्ट, ५ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि आता १५ ऑक्टोबरला बदल्यांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. बदल्या खरंच करायच्या असतील तर लवकर कराव्यात, नाहीतर यावर्षी होणारच नाही, असे स्पष्टपणे सांगावे, म्हणजे आम्ही व आमचे कुटुंबीय येथे राहण्याची मानसिकता बनवू, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका अधिका-याने व्यक्त केली.