शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी दिली आदिवासींना दिवाळीची भेट

By admin | Updated: October 29, 2016 01:48 IST

जिल्हा पोलीस दल व आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी पुणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशा दामरंचा गावात आदिवासी महिला,

आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमीचा उपक्रम : अतिदुर्गम दामरंचात पोहोचले पोलीस अधीक्षकअहेरी : जिल्हा पोलीस दल व आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी पुणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशा दामरंचा गावात आदिवासी महिला, पुरूष तसेच बालकांसह सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त गुरूवारी भेटवस्तू देण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे अतिदुर्गम दामरंचा गावात पोहोचले व त्यांनी तेथील आदिवासी नागरिकांशी थेट संवाद साधला. दामरंचाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांच्या संकल्पनेतून पुणे येथील आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी राष्ट्रीय सेवा योजना, जयनाथ मित्रमंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ व कनीपनाथ मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने पुणे येथे शालेय बॅग, कम्पास पेटी, बुक, पेन, महिलांसाठी साड्या, पुरूषांसाठी शर्ट-पॅन्ट तसेच इतर नवीन वस्तू मिळून एकूण दोन ते अडीच लाखांच्या नवीन भेट वस्तू जमा करण्यात आल्या. त्यानंतर गुरूवारी पोलीस दल व आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी पुणे यांच्यातर्फे दामरंचा येथील कार्यक्रमात या भेट वस्तू नागरिक व विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, दामरंचाचे प्रभारी पोलीस अधिकारी विलास मोरे, आविष्कार अ‍ॅकॅडमी पुणेचे अतुल मडकर, प्रवीण झिटे आदी उपस्थित होते.पोलीस दल सदैव आदिवासी नागरिकांच्या पाठिशी आहे. त्यामुळे समाजविघातक कृत्यांना सोडून पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले. एसडीपीओ जाधव यांनी नागरिकांना समाजविघात कृत्यांना साथ न देण्याची शपथ दिली. यावेळी दामरंचा, नैनगुडम, मांड्रा येथील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पीएसआय अनिल वलटे, नागनाथ पाटील व पोलीस जवानांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)